प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा व आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या सुचना
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : भारतीय जनता पार्टीचे मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे यांनी आगामी काळात होवु घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवाय प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा होणारा बीड दौरा पार्श्वभुमीवर पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्या सोबत बैठक घेवुन महत्वाच्या सुचना केल्या. ग्रामपंचायतीच्या निवडणुकी बाबतीत रणनिती कशी असावी? इथपासून महत्वाच्या प्रश्नावर पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के होते.
पक्षाच्या संघर्षयोद्धा कार्यालयात जिल्हा भाजपाची बैठक पार पडली. या बैठकीला माजी आ. आर.टी.देशमुख, राज्य प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सौ.उषाताई मुंडे, जिल्हा संघटन मंत्री प्रा.देविदास नागरगोजे, अॅड. वाल्मिक निकाळजे, डॉ.अभय वनवे, विक्रांत हजारी, नवनाथ आण्णा शिराळे, शंकर देशमुख, मीराताई गांधले, डॉ.लक्ष्मण जाधव, अजय सवई, बबनराव साळुंके, अरूण राऊत, भगवानराव केदार, पोपटराव शेंडगे, अच्युतराव गंगणे शांतीनाथ डोरले, किरण बांगर सुरेश उगलमुगले यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांचा सत्कार संपन्न झाल्यानंतर प्रास्ताविकद्वारे देविदास नागरगोजे यांनी बैठकीचे महत्व विशद केले. संजय कौडगे संघटन मंत्री असल्याने विविध मुद्याचा बारकाईने आढावा घेताना त्यांनी आगामी काळात होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका संघटनात्मक स्तरावर कशा लढाव्यात? हे सांगताना तीन ग्रामपंचायती एक प्रभारी अशी योजना बोलुन दाखविली.
फेब्रुवारी महिन्यापर्यंत जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर पालिकेच्या निवडणुका होवु शकतात हा अंदाजही त्यांनी बोलुन दाखविला. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्यात सर्व विभागात त्यांचा प्रवास दौरा असुन त्या अनुषंगाने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा दौरा होवु शकतो. दिवसभराच्या दौर्याचे बारकाईने नियोजन कसं आहे? त्या प्रवासात अध्यक्षांनी काय कार्यक्रम घ्यायचे? त्याची जबाबदारी कुणावर? या संदर्भात सविस्तर माहिती त्यांनी दिली.
या बैठकीला मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा. किरण पाटील यांची उपस्थिती असल्याने त्यांनी काही महत्वाच्या सुचना बैठकीत केल्या. या शिवाय डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेट निवडणुकीसाठी उमेदवार असलेल्या सौ.योगिता तौर, महम्मद अजरुद्दिन उर्फ गोलू हे उपस्थित होते. 26 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या मतदाना संदर्भात प्रा.कंदिले यांनी काही सुचना केल्या. अध्यक्षीय समारोप करताना जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के म्हणाले की, हा जिल्हा स्व. मुंडे साहेबांचा बालेकिल्ला असुन आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे आणि खा.डॉ.प्रितमताई यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात होणार्या निवडणुका असोत किंवा संघटनात्मक कार्यक्रम असोत जोरदारपणे यशस्वी करणार, असा संकल्प त्यांनी बोलुन दाखविला. बैठकीचे आभार भगवान केदार यांनी मानले.