विद्यार्थी चेंडू आणण्यासाठी पडीक घरात प्रवेश करताच ही स्फोटक वस्तू आढळून आली
By MahaTimes ऑनलाइन | सांगली
सांगली जिल्ह्यातील कुडनूर (ता. जत) या गावातील एका विनावापरातील जुन्या घरात हातबॉम्ब (हँड ग्रेनेड) सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही स्फोटक वस्तू विद्यार्थी चेंडू आणण्यासाठी खिडकीवाटे खोलीत गेले असता त्यांना बॉम्ब आढळून आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुडनूर येथील जिल्हा परिषद शाळेतील लहान मुले चेंडू खेळत होती. यावेळी त्यांचा चेंडू जुन्या घराच्या खोलीत गेला. मुलांनी खिडकीवाटे खोलीत प्रवेश करताच त्यांना ही बाँब सदृश्य वस्तु दिसली त्यानंतर भांबावलेल्या विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांनी माहिती दिली. ही माहिती समजताच उपसरपंच गुलाब पांढरे व पोलीस पाटील मंजुषा कदम यांनी तात्काळ जत पोलीसांना कळवल्यानंतर तत्काळ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा फौजफाटा दाखल झाला.
पोलीस उपाधीक्षक रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्यासंह सांगलीतील बॉम्ब शोधक-नाशक पथक, श्वान पथक, फिंगरप्रिट तज्ञांची टीम दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाली. बॉम्ब शोधक-नाशक पथकातील पोलीस निरीक्षक उदय पोतदार यांनी डॉग लिओ हे श्वान फिरविले. सदरील बॉम्ब जिवंत असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सांगली जिल्ह्यातील कुडनूर (ता. जत) या गावातील एका विनावापरातील जुन्या घरात हातबॉम्ब (हँड ग्रेनेड) सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही स्फोटक वस्तू विद्यार्थी चेंडू आणण्यासाठी खिडकीवाटे खोलीत गेले असता त्यांना बॉम्ब आढळून आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुडनूर येथील जिल्हा परिषद शाळेतील लहान मुले चेंडू खेळत होती. यावेळी त्यांचा चेंडू जुन्या घराच्या खोलीत गेला. मुलांनी खिडकीवाटे खोलीत प्रवेश करताच त्यांना ही बाँब सदृश्य वस्तु दिसली त्यानंतर भांबावलेल्या विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांनी माहिती दिली. ही माहिती समजताच उपसरपंच गुलाब पांढरे व पोलीस पाटील मंजुषा कदम यांनी तात्काळ जत पोलीसांना कळवल्यानंतर तत्काळ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा फौजफाटा दाखल झाला.
Maharashtra | A hand grenade was found at school in Kudnur village of Sangli dist when some school children went inside a room in the premises as their ball went inside through the window. Police along with a bomb squad reached the spot immediately:Ajay Sidankar, Police Inspector pic.twitter.com/u92VhE7EXv
— ANI (@ANI) July 30, 2022
पोलीस उपाधीक्षक रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्यासंह सांगलीतील बॉम्ब शोधक-नाशक पथक, श्वान पथक, फिंगरप्रिट तज्ञांची टीम दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाली. बॉम्ब शोधक-नाशक पथकातील पोलीस निरीक्षक उदय पोतदार यांनी डॉग लिओ हे श्वान फिरविले. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावातील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेचे बांधकाम सुरु असल्याने सदाशिव तुकाराम व्हनमाने यांच्या जुन्या घराच्या खोल्यांमध्ये मुलांची शाळा भरते. आज शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी खेळत होते. दोन्ही खोल्या नादुरुस्त असल्याने त्यामध्ये विद्यार्थी बसत नाहीत . बाहेरील खोल्यांमध्ये शाळा भरते आतील खोल्या बंद असल्याने त्यामध्ये कोणी जात नाही . त्या खोल्या विनावापर पडून आहेत. त्या ठिकाणी हा बॉम्ब आढळून आला. दरवाजा मोडल्याने एका बाजूने मुले खोलीत प्रवेश केल्याने हा हॅन्ड ग्रॅनाईट बॉम्ब दिसला आहे. हा बॉम्ब निकामी केल्याचे वृत्त आहे.
कुडनूरमध्ये बॉम्ब मिळण्याची दुसरी वेळ
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुडनूरमध्ये या अगोदर 2017 मध्ये दोन बॉम्ब सापडले होते. बॉम्ब सापडण्याची ही दूसरी वेळ आहे. बॉम्ब ताब्यात घेऊन याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी सांगलीला रवाना झाले.