शुक्रवारी कार्यक्रम : रूग्णसेवेचा दहा वर्षाचा यशस्वी टप्पा पार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : येथील प्रसिध्द स्वामी विवेकानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चा दशकपुर्ती समारोह व नूतन वास्तुत स्थलांतर कार्यक्रम 28 जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे.
रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद घेउन काम करणाऱ्या नवी भाजी मंडई येथील स्वामी विवेकानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ने रूग्णसेवेचा दहा वर्षाचा यशस्वी टप्पा पार केला आहे. दरम्यान हॉस्पिटल प्रशासनाने जास्तीत जास्त चांगली आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न केला व यापुढे ही करत राहणार आहे.
स्वामी विवेकानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल दशकपुर्ती समारोह व नूतन वास्तुत स्थलांतर असा दुग्ध शर्करा योग जुळून आला आहे. शुक्रवार, दि. 28 रोजी सकाळी 11 वाजता स्व. बाळासाहेब ठाकरे नगर, नेत्रधाम रोड, जालना रोड, बीड. येथे समारोह आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहुन आशिर्वाद द्यावेत असे आवाहन डॉ. संदीप येवले, डॉ. रोहित तोष्णीवाल, डॉ. शशिकांत ठोंबरे, डॉ. श्रीकांत केदार व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.