बीड दि. 04 (प्रतिनिधी): बीड जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व पोस्ट ऑफिसेस होणार CSC केंद्र भारतीय डाक विभाग व डीजीटल सेवा पोर्टल यांच्या संयुक्त विद्यमाने डीजीटल इंडियाप्रोग्रामला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भारतीय डाक विभाग लवकरच बीड जिल्हयातीलसर्व पोस्ट ऑफिस मधे CSC (Common Services Centre) सेवा उपलब्ध करणार आहे.CSC ( Common Services Centre) च्या माध्यमातून नागरिकांसाठी खालील सेवाशासनाने ठरवलेल्या दराने पुरवण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमा अंतर्गत बीड डाक विभागाने 257 कर्मचारी यांची यादी तयार केलीआहे.सदर कर्मचारी मागणी नुसार ई आरक्षित रेलवे तिकीट, जीवन प्रमाण, जीवन सामान्यविमा प्रीमियम कलेक्शन, आयुष्मान भारत, प्रधान मंत्री लघु व्यापारी मान-धन योजना, गैसकनेक्शन (बुकिंग) आणि लाईट बील, मोबाईल बील, ई श्रम नोंदणी,प्रधान मंत्री विमा योजनान्यू पेन्शन स्कीम, Fast Tag, इत्यादी सेवा प्रदान करतील.बीड जिल्हयातील सर्व नागरिकांनी वरील सेवांचा शासनाने ठरवलेल्या दर प्रमाणेलाभ घेण्याचे अवाहन श्री एस.एम अली अधीक्षक डाकघर, बीड डाक विभाग यांनी केलेआहे.
ही बातमी वाचा: अबब! एक कोटीचा गुटखा जब्त अमरावतीहून मुंबई कडे जातांना मुद्देमाल पकडला
1 thought on “सर्व पोस्ट ऑफिसेस होणार CSC केंद्र”