एक बस जळून खाक, प्रवासी, वाहक-चालक सूखरूप
बीड कडे येणाऱ्या सर्व गाड्या या पुढील आदेश येईपर्यंत थांबवण्याबाबत पोलीस अधीक्षक यांच्या सूचना
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : अज्ञात लोकांनी दोन एसटी बसेसलाअडवून त्यांच्यावर पेट्रोल टाकुन जाळण्याचा प्रयत्न केला. या दोन्हीही घटना शनिवारी रात्री उयाराने घडल्या. यात बस पूर्णत: जळून खाक झाली.
प्राथमिक माहितीनुसार बीड तालुक्यातील आहेरवडगाव फाट्याजवळ मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात सहा जणांनी अहमदपूर आगाराची आगाराची अहमदपूर – संभाजी नगर क्रमांक एम.एच. 13 सी.यू. 7987 वर दगडफेक केली. सदर बस थांबवून, दोन्ही बाजूंनी पेट्रोल ओतून पेटवून दिले. सदर बस चालकाने तात्काळ आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला. या बसमध्ये 55 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. संबंधित प्रशासनाने ही या घटनेस दुजोरा दिला आहे. आग विझवल्यानंतर ही बस 10-15 प्रवाशांसह बीड बसस्थानकाकडे रवाना झाली. सदर घटनेची नोंद बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
दुसरी घटना कोल्हारवाडीजवळ घडली. बीडहून कोल्हापूरकडे प्रवासी घेउन जाणारी एस. टी. बस अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिली. या घटनेत बस पुर्णपने जळून खाक झाली. या बसमध्ये अबाल, वृद्ध प्रवासी होते. अशी माहिती आहे. मात्र या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या बसमध्ये किती प्रवासी होते? ही माहिती उपलब्ध नाही. सदर बस मध्ये प्रवासी होते का या घटनेस प्रशासनाने दुजोरा दिला नाही. विशेष म्हणजे बसमध्ये प्रवासी असताना हा प्रकार घडल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.