मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा विकास, सिंचनाची व्यवस्था, ऊसतोड कामगारांसाठी काल झालेल्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध योजना, या सर्व माध्यमातून बीडला बळ देण्याचे काम केलेले आहे असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज येथे केले. येथील पोलीस मुख्यालयातील मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी श्री मुंडे बोलत होते.

यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर स्वातंत्र्यसैनिक समाजातील विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर समाजसेवक आणि बीडकर जनता मोठ्या संख्येने आजच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात उपस्थित होती. श्री मुंडे पुढे म्हणाले, यंदा पावसाने ओढ दिली त्यामुळे पाण्याअभावी पिके संकटात आली. शेतकऱ्यांची व्यथा जाणणाऱ्या या सरकारने या आधी एक रुपयात “पिक विमा योजना’ राबवली त्यामुळे आपण शेतकऱ्यांना विमा संरक्षणातून जिल्ह्यात 86 मंडळांमध्ये नुकसान लक्षात घेता 25 टक्के अग्रीम मंजूर करण्याची कार्यवाही केली असल्याचे व सर्व माध्यमातून बीडला बळ देण्याचे श्री मुंडे यांनी सांगितले.
संपूर्ण बीड जिल्हयाचा कायापालट व्हावा या दृष्टीकोणातून काल झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठोस निर्णय घेण्यात आले, त्यातदेखील शेतकरी केंद्रस्थानी मानून निर्णय घेण्यात आले आहेत, असे श्री मुंडे यावेळी म्हणाले.बीड मधील कृषी विभागाच्या कार्यालयासाठी १४ कोटी ९० लाख रुपये यापूर्वीच मंजूर करण्यात आलेले आहेत. कालच्या बैठकीत बीड येथे सिताफळ व इतर फळांच्या प्रक्रिया उद्योग उभारणीस मान्यता देण्यात आली आहे. मुलभूत सुविधा विस्तारात अंबाजोगाई येथील शासकीय कृषी विद्यालयात मुले आणि मुलींच्या वसतीगृहास मान्यता दिली आहे. या सर्वांसाठी ११० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे श्री मुंडे यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यात कृषी विभागामार्फत परळी तालुक्यातील उपलब्ध जागेत एक शासकीय कृषी महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आणि त्याचबरोबर सोयाबीन संशोधन, प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्र उभारण्यास मंजुरी दिली आहे. या केंद्रामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितच चांगले दिवस येतील, असा विश्वास श्री मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला. जायकवाडी टप्पा 2 अंतर्गत पैठण उजव्या कालव्यातून माजलगाव धरणात पाणी आणणे व पुढे ते पाणी माजलगाव उजव्या कालव्यातून पुढे सुमारे 150 किलोमीटर पर्यंत घेऊन जाणे, या उद्देशाने 561 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, याद्वारे जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील सुमारे 85 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे हे सांगताना आनंद होत असल्याचे ते म्हणाले.
जिल्ह्यात ऊसतोडीसाठी जिल्हयाबाहेर जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे अशा कामगांरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सर्वांची विनंती लक्षात घेऊन कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनेत ८० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याचा लाभ जिल्यातील १६०० मुलींना मिळणार आहे यामुळे यापुढे मुलींचे शिक्षण थांबणार नाही असा असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.काळानुरूप कार्यालयांचे स्वरूप बदलावे यासाठी बीड येथे बीड जिल्हाधिकारी कार्यालय इमारत उभारणीसाठी ६३ कोटीहून अधिक खर्चाचा आराखडा कालच मंजूर केला सोबतच पाटोदा तसेच बीड येथील प्रशासकीय भवन देखील आता नव्याने उभारण्यात येईल यामुळे प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळेल, असेही श्री मुंडे यावेळी म्हणाले.
