उद्योजकांचे संघटन करणारी वींग बीडमध्ये कार्यान्वित!
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : व्यवसाय वृध्दी आणि आर्थिक संघटन करत यशस्वी उद्योजकांची जितो युथ संघटना बीडमध्ये दाखल झाली असून बीड येथील अक्षय अशोक लोढा अध्यक्षपदी तर सचिवपदी रोशन विजयराज बंब यांची निवड करण्यात आली आहे. जागतिक पातळीवरचे औद्योगिक मानक, संशोधन, उत्पादन आणि बाजारपेठ या संदर्भाने उद्योजकांचे संघटन करणारी वींग बीडमध्ये कार्यान्वित झाली आहे.
युवकांना व्यवसाय प्रिय बनवून त्यांना दिशा देणारी जितो युथ वींग 3 सप्टेंबर रोजी बीडमध्ये दाखल झाली असून जिल्ह्यातील 40 युवकांची नोंदणी झाली आहे. युवकांना उद्योजक बनवण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणारी ही वींग संपूर्ण भारत व भारताबाहेर देखील काम करत आहे. या निमित्ताने श्रावकांच्या व साधू-संतांच्या आरोग्यावर आणि समाजातील युवकांच्या शिक्षणावर देखील सामाजिक दायित्व उचलत आलेली आहे. आंतरराष्ट्रीय संशोधन, बाजारपेठ व माहिती या वींग मार्फत या नवयुवकांना मिळणार आहे. यातून जिल्हयात नवीन उद्योजक घडणार आहेत.
अक्षय लोढा व रोशन बंब हे अत्यंत चिकाटी व निष्णात उद्योजक आहेत. यांच्या निवडीने जिल्हयात नव उद्योजकांना योग्य नेतृत्व मिळाले आहे. यावेळी पारस ओस्तवाल यांनी शुभेच्छा देतांना सिनीयर चाप्टर देखील चालू करावे अशी मागणी केली. संपादक विजयराज बंब, अशोक लोढा, गौतम खटोड, प्रकाश नहार यांनी शुभेच्छा देवून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुरक्षा कटारीया यांनी तर जितो वींगची माहिती गौरव नहार, रजत हार्डी, डिंपल पगारीया यांनी दिली. तर यावेळी दिव्या ओस्तवाल, मिहीर बंब, आशिष सकलेचा, सी.ए. आदेश नहार, केतन छाजेड, सचिन कांकरीया, सागर कोटेचा, अमित पगारीया, डॉ. विनोद ओस्तवाल, हेमकनजी समदरीया, ईशा ओस्तवाल, विकास लोढा, आकाश कोटेचा, सिध्दार्थ मुनोत यांच्यासह सर्व जितो वींगचे सदस्य उपस्थित होते.
आता, वींग महिलांना मुख्य प्रवाहात घेवून येणार -रवि खिंवसरा
जैन समाजातील प्रत्येकाने या वींगमध्ये सहभागी झाले पाहिजे. असे जितो वींगचे रेस्ट ऑफ महाराष्ट्र रवि खिंवसरा यांनी म्हटले. यावेळी त्यांनी ही वींग महिलांना मुख्य प्रवाहात घेवून येणार असल्याचे सांगत व्यवसायिक शिक्षण असलेल्या महिला उद्योजकांची निर्मिती करणे हा आपला हेतू असल्याचे देखील खिंवसरा यांनी म्हटले.