पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट, पोलिसांवर दगडफेक
नियंत्रणासाठी पोलिसांचा लाठीचार्ज, हवेत गोळीबार ; 3 ते 4 बस आंदोलकांनी पेटवून दिल्या
बीड : जालन्यात अंतरावाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणादरम्यान राडा. आंदोलकांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस होता. या आंदोलनावेळी पोलिसांनी हा लाठीचार्ज केलाय…पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट.. नियंत्रणासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार.. संतप्त आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या जाळल्या. शहागड बस स्थानकात उभ्या असलेल्या 3 ते 4 बस आंदोलकांनी पेटवून दिल्या.
जालन्यातील अंतरवलीमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलनाकडून उपोषण करण्यात आले होते. मात्र, या शांततापूर्ण आंदोलनाचे रुपांतर हिंसेत झाले. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर वाद चिघळला. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी टिअर गॅस आणि हवेत गोळीबार केला.
बीडमधील संघटनांची बीड बंदची हाक
जालन्यातील या आंदोलनाचे पडसाद आता राज्याच्या दुसऱ्या भागातही उमटत आहे. या घटनेनंतर बीडमधील संघटनांनी बीड बंदची हाक दिली तर, नाशिकमध्ये उद्या मराठा संघटनांकडून निदर्शने करण्यात येणार आहेत. धुळे-सोलापुर महामार्गावर आंदोलकांकडून बस पेटवण्यात आली. अशातच, शहागड बस स्थानकात उभ्या असलेल्या 3 ते 4 बस आंदोलकांनी पेटवून दिल्या. या घटनेचा व्हिडीओ व्हायरलं होत आहे. या व्हिडीओमध्ये आगारात उभ्या असलेल्या बस जळताना दिसतं आहेत.
जालन्यातला लाठीचार्ज दुर्दैवी – मुख्यमंत्री शिंदे
जालन्यातला लाठीचार्जचा प्रकार दुर्दैवी आहे, तो संयमानं घ्यायला हवा होता, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूनं आहे. सगळ्यांनी शांतता राखावी, असं आवाहन एकनाथ शिंदेंनीकेलंय.