राखी पौर्णिमा : पंकजासह प्रीतम, यशश्रींनी धनंजय मुंडे यांना बांधली राखी
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : मुंडे परिवार एकत्र येणार का या विषयांवर आतापर्यंत खूप चर्चा रंगल्या. अनेकांनी अंदाज वर्तविले ते फोल ठरले. अलीकडे धनंजय मुंडे यांनी अजित पवार गटासोबत शिंदे-फडणवीस सरकारशी हाथ मिळवित मंत्री पद ही पदरात पाडुन घेतल्यानंतर आता मुंडे भावा-बहिणींच्या नात्यात आणखी कटूता आली असे वाटत असतांनाच आज राखी पौर्णिमेनिमित्त राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज आपल्या भगिनी पंकजाताई मुंडे यांच्यासह प्रीतम ताई मुंडे आणि यशश्रीताई मुंडे यांच्याकडून राखी बांधून घेतली. एवढेच नव्हे तर माते समान श्रीमती प्रज्ञाकाकू यांचे आशिर्वाद ही घेतले.
या निमित्ताने सन 2009 नंतर प्रथमच (तब्बल तेरा वर्षांनी) बुधवारी सर्व कुटुंबीयांनी एकत्रित राखी पौर्णिमेचा सण साजरा केला. मुंडे भाऊ-बहीण रक्षाबंधनाच्या पवित्र धाग्यात बांधले गेल्यानंतर पुन्हा राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे. Munde family together after a lot of hardship! Rakhi Poornima: Pritam along with Pankaja, Yashshree tied Rakhi to Dhananjay Munde