सभा प्रचंड यशस्वी : अजित दादा यांचा भरसभेत वादा
By MahaTimes ऑनलाइन | रईस खान
बीड : आमचा प्रमुख उद्देश हा काम करण्याचा आणि विकासाचे धोरण आखण्याचा आहे. एवढ्यासाठीच आम्ही महायुती सोबत गेलो आहोत. असे स्पष्ट करत आगामी एप्रिलमध्ये 6 लाख कोटींचा अर्थसंकल्प मांडणार आहे, त्यात बीड जिल्ह्याला झुकते माप दिले जाईल. बीड जिल्ह्याच्या सर्वांगीन विकास साधण्यासाठी, दुष्काळमुक्तीसाठी आणि ऊसतोड कामगारांचे स्थलांतर रोखण्यासाठी पश्चिमेचं पाणी पुर्वेला आणायचा प्रयत्न करू असा वादा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (दि. 27) येथील सभेत केला.
राष्ट्रवादी कांग्रेस (अजित पवार गट) यांच्यावतीने रविवारी सायंकाळी छ. संभाजीराजे क्रीडा मैदान (मल्टीपर्पझ ग्राउंड) येथे आयोजित सभेत अजित पवार यांनी वरील विधान केले. या प्रसंगी व्यासपीठावर प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री प्रफुल्ल पटेल, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री छगन भुजबळ, मंत्री धनंजय मुंडे, महिला आयोग च्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आ. प्रकाश सोळंके. मा. आ. अमरसिंह पंडित, आ.बाळासाहेब आजबे, आ. विक्रम काळे, योगेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, धनंजय मुंडें यांच्या वाट्याला कायम संघर्ष आलेला आहे. येत्या एप्रिलमध्ये 6 लाख कोटींचा अर्थसंकल्प मांडणार आहे, त्यात बीड जिल्ह्याला झुकते माप दिले जाईल, बीड जिल्ह्याचा पालकंमत्री हा राष्ट्रवादीचाच राहील, असे स्पष्ट करीत धनंजय मुंडेंच्या पालकमंत्री पदाबाबत संकेत देत धनंजय मुंडेंचे कौतुकही केले.बीडच्या जनतेची सभेला उपस्थिती पाहुन त्यांचे जनतेचे आभार मानले. प्रत्येकाच्या जीवनामध्ये राजकीय चढउतार येतात. आम्ही जरी महायुती सरकारमध्ये आलो असलो तरी सर्व जाती-धर्मात सलोखा राहिला पाहिजे, हे कृतीतून आम्ही दाखवणार आहोत. आम्ही महापुरूषांसमोर नतमस्तक होणारी माणसं आहोत, असे म्हणत अजितदादांनी बीड जिल्ह्याच्या पीकविम्याबाबतचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर असल्याचे सांगितले. या वेळेस एक रुपयामध्ये शेतकऱ्याना पिक विमा काढता आला. तिजोरीवर साडेचार हजार रुपये कोटींचा बोजा पडला तरी शेतकऱ्यासाठी काही हरकत नाही. अजित पवारांनी कांदा प्रश्न सोडविण्यासाठी धनंजय मुंडेंना दिल्लीला पाठवले, असं म्हटलं. 2 लाख मे.टन कांदा 24 रुपयाने खरेदी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे. आता आम्हाला महाराष्ट्राचा विकास साधायचा आहे. सर्वसामान्यांच्या आणि तरुणांच्या हाताला काम मिळवण्यासाठी उद्योग धंदे महाराष्ट्रात यायला हवेत, त्यासाठी देवेंद्र फडणवीस उद्योग आणण्यासाठीच जपान दौऱ्यावर गेले आहेत असे म्हणाले.
अजित पवारांसोबत गेलो त्यात काय चुकलं? : मुंडे
कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही सभा कोणालाही उत्तर देण्याची नव्हे तर उत्तरदायीत्वाची सभा आहे. बीड जिल्ह्याने शरद पवारांवर प्रचंड प्रेम केले, पण “बीडला काय मिळाले? त्या प्रेमाचं उत्तरदायी म्हणून अजित पवारांनीच बीडचा विकास केलाय, त्या उत्तरदायीत्वाची, बीडच्या अस्मितेची, सन्मानाची ही सभा असल्याचे सांगितले. मे जब बोलता हु तो करके दिखाता हू असं नेतृत्व म्हणजे अजित पवार आहेत. अजित पवारांनी बीडच्या जनतेस वत विकासाचा वादा करावा. गोपीनाथ मुंडेंच्या नावाने उसतोडणी कामगारांनी इतरांनी फक्त घोषणा दिल्या, निधी मात्र अजित पवारांनी दिला, त्याला आणखी गती मिळावी अशी अपेक्षाही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. बीड जिल्हया साठी फक्त अजित पवारांनीच खूप काही केले आहे, पण अजित पवारांनी शब्द दिला तर जिल्ह्यातील दुष्काळ कायमचा मिटेल, जिल्ह्यातील धरणात पाणी आणा यासाठी जे करावं लागेल ते करा असे मुंडे म्हणाले. पुढे म्हणाले की,आज एकाच गोष्टीची खंत. माझा इतिहास सर्वांना माहितय. पण शरद पवारांच्या समेत माझा इतिहास विचारला गेला, आज तो सांगतोय. विधान परिषद निवडणुकीत मला कमी असणारी दोन मत अजित पवारांनी दिली, म्हणून हा धनंजय मुंडे इथे उभाय, मग मी अजित पवारांसोबत गेलो त्यात काय चुकलं? मी दिवंगत गोपीनाथ मुंडे कडून संघर्ष शिकलो, प्रश्नासाठी संघर्ष करणं हा माझा इतिहास, पराभव होणार माहित असतानाही पक्षादेश म्हणून निवडणूक लढलो हा माझा इतिहास. विरोधी पक्षात असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मी संघर्ष केला असे मुंडे म्हणाले.
शिवछत्रच्या देवघरातील फोटो काढता का? : अमरसिंह पंडित
पंडित वय झाले असे बोलण्याचे काय कारण? तुमच्या मागे बोलणे कदापिही य नाही. शिवछत्रच्या देवघरात तुमचा फोटो आहे? काढता का? लोक तुम्हाला आमचे विठ्ठल म्हणतात. जन्मदाता पित्यापलीकडे आम्ही नेऊन ठेवले. तुमचे संस्कार आहेत. तुमच्या पठडीत. संस्कारात वाढलेलो आहोत. साहेब आमच्या निष्ठेवर शंका घेऊ नका. पवारांच्या चौकटी दोन करू नका, असे म्हणत होतो…विकासासाठी दादा, धनंजय मुंडेबरोबर राहण्याची भूमिका बदलू शकणार नाही. सिंदफणा खोचऱ्यात सातही बरेज करावेत. पाच किलोमीटरपर्यंत पाणी नेता यावे, असे स्वप्न पाहिले तर आमची चूक काय? वॉटरग्रिडमध्ये गोदावरीला पाणी आले तर पाटोदा, माजलगाव, परळीपर्यंत सुजलाम् सुफलाम् होईल. यात गैर काय. असा सवाल माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केला.
या झिंगाट बॅट्समनला झिरोवर आउट करायचयं, आम्हाला ताकद फक्त द्या – योगेश क्षीरसागर
स्व. केशरकाकू, माझे वडील डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी ज्या पक्षात हयात घालवली, त्या पक्षात आल्याने कुटुंबातच आल्याची भावना आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकत्यांच्या भावना लक्षात घेऊन आपण अजित पवार, धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात आला असे स्पष्ट कर संघातील विविध प्रलबित प्रश्न अजित पवार समोर मांडत डॉ. योगेश क्षीरसागर यांनी भाषणादरम्यान बीडचे आ. संदीप क्षीरसागर यांचे नाव न घेता टिका केली. ते म्हणाले, २०१९ मध्ये बीडच्या आमदारांनी आ.प्रकाश सोळंके यांच्याकडून पॅड घेतले, अमरसिंह पंडितांकडून हॅन्ड ग्लोज घेतले, अजित पवारांचे हेल्मेट घेतले आणि धनुभाऊंच्या सैराट बॅटने झिंगाट होऊन सिक्स मारला होता, त्यानंतर ते बुंगाट होऊन पळून गेले, आज जनता त्यांना शोधतेय. त्यांच्यामुळे चार वर्षात निर्माण झालेला विकासाचा अनुशेष अजितदादांच्या माध्यमातून आता एक-दीड वर्षात भरून काढायचा आहे. आणि आगामी विधानसभा निवडणुकीत या झिंगाट बॅट्समनला झिरोवर आउट करायचे आहे. त्यासाठी आमचे सहकारी राष्ट्रवादीतील सहकार्यांच्या खांद्याला खादा लावून काम करतील, फक्त आम्हाला ताकद द्या, अशी अपेक्षा डॉ. योगेश क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे व्यक्त केली.