या सभेकडे राज्याचे लक्ष लागून, ही सभा रेकॉर्डब्रेक होईल अशी अपेक्षा
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत उद्या होणारी जाहीर सभा ऐतिहासिक आणि आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडणारी ठरेल असा दावा केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सभेची सुरू असलेली रात्रदिवसची तयारी, शहरभर लागलेले अभुतपूर्व आणि आत्तापर्यंत कधीही न पाहिलेले बॅनर, सर्वच नेते पदाधिकाऱ्याकडून सुरू असलेली तयारी पाहता ही सभा रेकॉर्डब्रेक होईल अशी अपेक्षा आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये उद्या छत्रपती संभाजी महाराज स्टेडियमवर जाहीर सभा होत असून या सभेसाठी खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुनील तटकरे, ना. दिलीप वळसे पाटील, ना. छगन भुजबळ, ना. धनंजय मुंडे, ना. हसन मुश्रीफ, ना. धर्मराजबाबा आतराम, ना. अनिल भाईदास पाटील, ना. संजय बनसोडे, ना. अदिती तटकरे, महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर हे मंत्री उपस्थित राहणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्वागतासाठी बीडनगरी पुर्णत: सजली आहे. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचंड शिगेला पोहचला असून मंत्र्यांच्या स्वागतासाठी सभास्थळ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जालना रोडसह बीड शहरात मोठमोठ्या कमानी लावण्यात आल्या आहेत. उद्याच्या या जाहीर सभेतून राजकीय उत्तरापेक्षा उत्तरदायित्व आणि बीड जिल्ह्याच्या समस्यांचे उत्तर शोधले जाणार आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादासंह सहकारमंत्री, अन्न व पुरवठा मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, अन्न व औषध प्रशासन मंत्री, क्रीडा व युवक कल्याणमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, महिला व बालविकास मंत्री, कृषीमंत्री हे उद्या एका व्यासपीठावर आहेत. हे सर्व खाते अत्यंत महत्वाचे असून या खात्यांतर्गत बीड जिल्ह्याला मोठी मदत होणार असल्याने या सभेकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ज्या पध्दतीने सभेचे नियोजन केले आहे, त्यानुसार ही सभा खरोखरच बीड जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी अजितदादांच्या राष्ट्रवादीचं ताकद देणारी ठरू शकते. बीडमध्ये उद्या पहायला मिळणार असून या वादळाच तडाखा विरोधकांना नक्कीच बसेल अशी दावा ही केला जात आहे. दरम्यान बीडमध्ये होणारी उद्याची अजितदादांची सभा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाला हत्तीचे बळ देणारी ठरेल. त्याचबरोबर ही सभा आ.प्रकाशदादा सोळंके, आ.बाळासाहेब आजबे, माजी आ.अमरसिंह पंडित, डॉ. योगेश क्षीरसागर यांचे नेतृत्व सिध्द करणारी आणि त्यांची ताकद वाढवणारी ठरेल.