शेकडो मावळे मुंबईकडे रवाना : आज 23 रोजी मुंबईत पक्ष प्रवेशाचा मुहूर्त साधणार
By MahaTimes ऑनलाइन | रईस खान
बीड : युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात सामिल होणार आहे. मागील दोन दिवसांपासुन ‘ते’ राजधानी मुंबईत डेरे दाखल असुन. भैय्यांचे बोलावणे आले म्हणत शेकडो मावळे मंगळवारी रात्रीच मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज (दि. 23) रोजी दुपारी 3 वाजता मुंबईतील मरिन लाईनजवळील गरवारे हॉलमध्ये योगेश क्षीरसागर यांचा अधिकृत पक्ष प्रवेश होणार आहे.
राज्यातील सत्तानाट्यानंतर बीडमध्ये बऱ्याच उलथापालथी होत आहेत. बीडचे राजकारण ढवळुन निघत आहेत. मागील पाच वर्षापूर्वी संदीप क्षीरसागर यांनी वेगळी चुल मांडली आता ‘योगेश’ च्या रूपात क्षीरसागर कुटुंबातली दुसरी फुट व तिसरा क्षीरसागर समोर आल्याचे बोलले जात आहे. तर दूसरीकडे येत्या रविवारी (दि.27) बीड येथे अजित पवार यांची सभा होत आहे. यापुर्वीच योगेश पर्वाचा राष्ट्रवादीत उदय होत असल्याने राजनितीक गणिते गतीने बदलताना दिसत आहेत.
शिवसेना (ठाकरे गटातुन ) बाजुला झाल्यानंतर जयदत्त क्षीरसागरांनी राजकारणाला काही कारणास्तव बाजुला सारत विकास कामात स्वतःला: झोकुन दिले होते. ‘वेट अँड वॉच ची भूमिका स्वीकारत ते योग्य संधीची वाट पाहत होते. मात्र, दूसरीकडे त्यांचा पुतण्या योगेश क्षीरसागर रिस्क घेत थेट अजित गटात प्रवेशाचा निर्णय घेतला. हा जयदत्त क्षीरसागरांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पुतण्या योगेश क्षीरसागरचा निर्णय त्यांना मान्य नाही. आताच घाईगडबड नको जनतेचा कौल महत्वाचा याभूमिकेवर ठाम राहत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मात्र राजकीय दृष्ट्या तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे.