धनंजय मुंडे यांनी परळीची सभा जिंकली, आता, राहिलेली आश्वासने वर्षभरात पूर्ण करून दाखवीन
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : सता येते आणि जाते, मात्र सत्ता गेल्यानंतर काय फरक असतो हे मी मागच्या एक वर्षांच्या काळात पाहिले आहे. मात्र बीड जिल्ह्यातील जनतेने माझ्याप्रति खूप प्रेम आणि अमुलकी दाखवली आहे. म्हणूनच आज त्याच जनतेला मी दुसऱ्यादा मंत्री झाल्यावर अभूतपूर्व आनंद पहायला मिळत आहे. मंत्री झालोय. तुमच्या अपेक्षा वाढल्यात हे मला माहिती आहे.
कार्यकत्याच्या अपेक्षा पूर्ण करनं अवघड नसतं, पण नाराज होवू नका. मी यापूर्वी जी आश्वासने दिली त्यातील 65 टक्के पूर्ण केली. आता राहिलेली 35 टक्के आश्वासनही पूर्ण करून दाखवीन असा शब्द देतो असे सांगत मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीची सभा जिंकली, संकटकाळात पाठीशी राहणाच्या जनतेच्या उपकाराची परतफेड याजन्मी करू शकणार नाही.
मंत्री म्हणून पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात आलेल्या धनंजय मुंडे यांचा परळीत भव्य नागरी सत्कार झाला. हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत वेळेची कमतरता असतांनाही धनंजय मुंडेंनी आपल्या भावनांना वाट करून दिली. मी परळीकरांना शब्द दिला होता की राजकीय पटलावर ज्यावेळी काही उलथा पालथी घडतील त्यावेळी परळीच्या वैद्यनाथाला विचारल्याशिवाय काही होणार नाही, आज ते सिद्ध झाले आहे.
काही महिन्यापूर्वी याच मातीत मी म्हटल होत जरा सा वक्तने साथ क्या ना दिया, लोग मेरी काबिलियत में शक करने लगे आज आपण काबिल आहोत हे मी देशाला दाखवून दिल आहे. माय बाप जनतेची सेवा करायची तीच आपली भावना आहे. सत्ता येत असते. जात असते पण वाईट काळात ज्यांनी मदत केली त्याचे कारचे नसतात. 2010 ला विधान सभेला मी लायक असताना परिषद लढवावी लागली. त्यावेळी सभागृहात जायला दोन मतं कमी होती, ती दोन मतं मला अजीत पवारांनी दिली हे कसं विसरायचं असेही धनंजय मुंडे म्हणाले.
मंत्री मुंडे पुढे म्हणाले की. परळीतल्या या पोरावर इथल्या जनतेनं अभुतपूर्व प्रेम केलं, इथल्याच नाही जिल्ह्यातल्या जनतेनं प्रेम केलं. सकाळी 7 ला बाहेर पडलो होतो, परळीत पोहोचायला 9 वाजले. इतकं सारं प्रेम जनतेनं केलं आहे. इथल्या प्रत्येक कुटुंबाशी माझं नातं आहे. हे नातं मुलाचं आई बापाशी असतं तसं नातं आहे. असे म्हणत मंत्री धनंजय मुंडे भावूकपणे परळीच्या जनतेसमोर नतमस्तक झाले.
आता मंत्री झालोय, लोकाच्या अपेक्षा वाढल्या कार्यकत्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं अवघड नसत पण वेळ लागेल, नाराज होवू नका, विधानसभेच्या प्रचाराच्या वेळी जीजी आश्वासने दिली होती ती आश्वासने मो वर्षभरात पूर्ण करील. आज खुप काही होतं पण वेळ नाहीय त्यामुळे जास्त बोलता येत नाही, मात्र याच जागेवर राज्याच्या अख्ख्या मंत्रीमंडळाला तुमच्या समोर आला आपल्याला दादाच एकनाथ शिंदेचं, फडणवीसांचं ऋण व्यक्त करायच आहे. शेवटी इतकंच सांगतो विश्वास ठेवा जिथे जाल तिथं मान उंच करून सांगाल, तुम्ही परळीच्या भुमितले आहात आणि तुमचा लोकप्रतिनिधी धनंजय मुंडे आहे असं काम करेल असे म्हणत मुंडे भावूक झाले.