फटाक्यांची आतिषबाजी, अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : महाराष्ट्राचा बुलंद आवाज लोकनेते धनंजय मुंडे यांचे आज बीड जिल्ह्यात दणदणीत स्वागत होत असून धानोरा, कडा, आष्टी, जामखेड, पाटोदा येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांसह समर्थकांनी जंगी स्वागत केले.
आष्टीमध्ये आ. बाळासाहेब आजबे यांच्या संपर्क कार्यालयासमोर हजारो समर्थकांच्या उपस्थितीत 500 किलोचा हार घालून मुंडेंचे स्वागत करण्यात आले. पुढे मुंडे जामखेड, पाटोदा आणि लिंबागणेश येथे आले. त्या ठिकाणीही धनंजय मुंडेंचे जल्लोष आणि उत्साहात स्वागत झाले. गावागावात धनंजय मुंडेंचे अभूतपूर्व स्वागत होत असून पुढे बीड, घाटसावळी, वडवणी, कुप्पा फाटा, तेलगाव, धारूर, केज, अंबाजोगाई येथील कार्यकर्त्यांनी स्वागताची जय्यत तयारी केली असून परळी वैजिनाथ येथे मुंडेंच्या स्वागतासाठी आसुसलेल्या समर्थकांनी दिवाळी सदृश्य स्थिती निर्माण केली आहे. परळीच्या स्वागताकडे जिल्ह्याचेच नव्हे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
धनंजय मुंडे प्रथमच जिल्ह्यात डेरेदाखल होत आहेत. लोकाभिमुख विकासात्मक भूमिकेत असलेले धनंजय मुंडे हे लोकनेते ठरत असून बीड जिल्ह्यात त्यांच्या स्वागतासाठी गेल्या तीन दिवसांपासून कार्यकर्त्यांसह समर्थकांनी मोठी जय्यत तयारी केली होती. मोठमोठे फ्लेक्स, जिल्ह्यातल्या प्रत्येक शहरात आणि महामार्गावरच्या प्रत्येक ठिकाणी दिसून येत आहेत. आज सकाळी मुंडे हे बीड जिल्ह्याच्या सीमेवर येताच फटाक्यांची आतिषबाजी, तोफांचा दणदणाट, ढोल-ताश्यांचा गजर, फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडेंचे स्वागत केले. सर्वप्रथम धानोर्यामध्ये धनंजय मुंडेंचे स्वागत झाल्यानंतर कडा या ठिकाणी उत्स्फूर्त कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडेंचे हार घालून ढोल ताश्याच्या गजरात स्वागत केले. आष्टी शहरात दाखल होताच तिथेही कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह दिसून आला.
धनंजय मुंडे साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’च्या घोषणांनी शहर दुमदुमून गेले. आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या संपर्क कार्यालयासमोर पाचशेपेक्षा जास्त किलोच्या फुलांच्या हाराने मुंडेंचे स्वागत झाले. या वेळी राजेश्वर चव्हाण, सतीश शिंदे, परमेश्वर शेळके, काका शिंदे, महेश आजबे, शिवा शेकडे, शिवाजी नाकाडे, बबन काळे, बबन डोके, जालिंदर नरवडे, भाऊ घुले, नजीम शेख, अक्षय हळपावत, अशोक पोकळे, राजेंद्र जरांगे, महादेव कोंडे, भरत भंवर यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत नतमस्तक झाले. जामखेड, पाटोदा, लिंबागणेश, पुढे बीड, घाटसावळी, वडवणी, कुप्पा, तेलगाव, धारूर, केज, अंबाजोगाई येथील सत्कार स्वीकारून संध्याकाळी परळी येथे बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या सत्काराला उत्तर देणार आहेत. परळी प्रचंड सजली, नटली असून लोकनेत्याच्या सत्कारासाठी कार्यकर्ते धनंजय मुंडेंच्या वाटेकडे नजर लावून बसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.