दुसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हीं.एच.पाटवदकर साहेब यांचा निकाल
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात दोषी धरून तिघांना 4 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. सदरील निकाल 10 जुलै रोजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. व्ही. एच. पाटवदकर साहेब यांनी दिला आहे या निकालाकडे विशेष लक्ष वेधलेले होते. सरकारी वकील मंजुषा दराडे यांनी सदर प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने बाजू मांडली.
प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, खडकत ता.आष्टी जिल्हा बीड येथील महेश काळे दिनांक 13 /1 /2017 आष्टी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी धोंडीराम अजिनाथ शिंदे मच्छिंद्र आजिनाथ शिंदे व विजय अजिनाथ शिंदे यांच्याविरुद्ध दिनांक 13 /1 /2017 रोजी कलम 307,323,504,506,34 भादवि प्रमाणे महेश काळे व त्यांच्या वडीलास जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्यामुळे सदरचा कलमानुसार वरील तीनही आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता.प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगर यांनी करून वरील तीनही विरोधात बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.
सरकार पक्षाच्या वतीने सहा. सरकारी वकील ॲड. मंजुषा दराडे यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाच्यावतीने एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाने या प्रकरणात सादर केलेल्या पुराव्यामुळे व सरकारी वकील मंजुषा दराडे यांनी केलेल्या युक्तिवादामुळे बीड येतील दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब व्हि.एच. पाटवदकर यांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात दोषी धरून तिघांना 4 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. सदर प्रकरणात पेरवी अधिकारी म्हणून श्री मिसाळ व श्री जायभाय साहेब यांनी सहकार्य केले.