गोरगरिबांना जमिनीपासून, घरापासून बेदखल होवू देणार नाही : पप्पू कागदे
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : राज्यासह जिल्ह्यातील व तालुक्यातील गायरान धारक, शासकीय जमिनीवर अतिक्रमणी करून व घरे बांधून आपल्या कुटुंबांची उपजीविका भागवीत आहेत. त्यांना घरापासून बेघर करण्यासाठी व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणण्यासाठी शासनाकडून नोटीसा देण्यात येत आहेत. दिलेल्या नोटीसा रद्द करून अन्यायकारक निर्णय मागे घेण्यात यावा. या मागण्यांसाठी आज रोजी युवा रिपाइं प्रदेश अध्यक्ष तथा रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले.
यावेळी बोलताना पप्पू कागदे म्हणाले की 1964 पासून कसत असलेल्या जमिनी नियमाकुल करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले राज्याचे समाज कल्याण मंत्री असताना दि. 1 एप्रिल 1978 ते 14 एप्रिल 1990 पर्यंत कसं असलेल्या गायरान जमिनी नावे करण्यासाठी शासन निर्णय लागू केला. त्यामुळे लाखो हेक्टर जमिनी शासन निर्णय लागू झाल्यापासून गायरान धारक जमिनी नावे काढण्यासाठी पुराव्यासहित प्रस्ताव दाखल करून पाठपुरावा करीत आहेत. परंतु मंडळ अधिकारी, तलाठी यांनी गाव पातळीवरील राजकारणाच्या दबावापोटी गाव नमुना व ई-वर नोंदी घेतलेल्या नाहीत. अटी व शर्ती प्रमाणे गायरान जमिनी नियमाकुल करण्याचा आदेश असताना देखील गायरान धारकांची प्रस्ताव तहसील कार्यालय महसूल कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहेत. दलित बहुजन आदिवासी भूमिहीन गोर गरीब समाज बांधवांना जमिनीपासून व घरांपासून बेघर करण्याचा शासन निर्णय गोरगरिबांना उध्वस्त करणार आहे.
गोरगरिबांना जमिनीपासून व घरापासून वेदकल होऊ देणार नाही. कसेल त्याची जमीन राहील त्याचे घर ही भूमिका शासनाला मान्यच करावी लागेल. नसता या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात रिपाइंच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. रिपाइं प्रदेश अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी जाहीर सभेत दिला.
यावेळी अमृत सारडा, गोपाळ धांडे, बाजीराव बोबडे, सतपाल लाहोट, विनोद हातागळे, विलास भिसे, सीताराम ढोले, हिराबाई कांबळे, तेजराज केंगार, भारत कांबळे, फारुख पटेल, अमर नाईकवाडे, विजय चांदणे, यांच्या पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला.
या मोर्चात राजू जोगदंड, अविनाश नाईकवाडे, मझरखान, किसन तांगडे, मायताई मिसळे, सुभाष तांगडे, प्रभाकर चांदणे यांनी भाषणातून हल्बोल केला. यावेळी किशोर कांडेकर, दीपक कांबळे, महादेव उजगरे, सचिन कागदे, राकेश पंडित, गोवर्धन वाघमारे, उत्तम मस्के, दिलिप बनसोडे, संदिपान डोंगरे, रवि जोगदंड, रेश्माताई जोगदंड, बापू पवार, महेश आठवले, अविनाश जोगदंड, प्रभाकर चांदणे, अड. श्रीकांत साबळे, सुभाष तांगडे, सतीश शिंगारे, नागेश शिंदे, भाऊसाहेब दळवी, शाम वीर, आप्पा मिसळे, दिलीप खंदारे, भीमराव घोडेराव, बिभीषण जावळे, महेश कागदे, धम्मा पारवेकर, मिलिंद पोटभरे, अक्षय कोकाटे, संतराम घोडके, बापू कुचेकर, दीपक अरुण, सचिन वडमारे, पांडुरंग अंकुटे, भैय्यासाहेब मस्के, राम तांगडे , पप्पू वाघमारे, गौतम कांबळे, महेंद्र वडमारे, भैय्यासाहेब साळवे, शहादेव ढोकणे, कुमार अरुण, अण्णासाहेब सोनवणे, प्रकाश वाघमारे, मनोज बोराडे, आकाश वडमारे, चेतन चक्रे, अशोक वीर, भिमा निंबाळकर, भाऊसाहेब कांबळे, राहुल कांबळे, भैय्या वाघमारे, भाऊसाहेब जावळे, नामदेव वाघमारे, रतन वाघमारे, विशाल इंगोले, राजाभाऊ वक्ते, विनोद शेजवळ, सुदामराव हुंबरे, अशोक वाघमारे, नितीन शिंदे, श्रीमंत जाधव, विजय ओव्हाळ, समाधान गवळी, राजेंद्र शेळके, शहाजी सोनवणे, विलास जोगदंड, गणेश वाघमारे, अजित सावंत, विक्रांत वाघमारे, अप्पा पवार च्यासह गायरान धारक व घर धारक , रिपाइंचे पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
या मागण्यांसाठी काढला मोर्चा
इंदिरानगर येथील भारत आवचार यांच्या कुटुंबांना न्याय देण्यात यावा. दैनिक सम्राटचे जिल्हा प्रतिनिधी प्रा.रंजित इंगळे यांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. परळी पो.स्टेच्या कस्टडीमध्ये मृत्यू पावलेल्या जरीन खान यांच्या कुटुंबियाला न्याय देण्यात यावा. लातूर जिल्ह्यातील रेणापूर, आणि कल्याण येथील दलित अत्याचाराच्या व जातीय तणावाच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने या वाढत्या घटना रोखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत.