सीओ निता अंधारेंच्या नेतृत्वात स्वच्छतेचे अहोरात्र काम सुरू
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : पावसाळ्यात बीड शहर जलमय होते. हा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे. मात्र यंदाच्या पावसाळ्यात अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी न. प. प्रशासनाने नियोजन करून मान्सूनपूर्व कामे युद्धपातळीवर हाती घेतली आहे. शहरातुन वाहणारी बिंदुसरा नदी व मोठे नाले तसेच ज्या ठिकाणाहून पावसाचे पाणी जाते, असे सर्व मार्ग जेसीबी व पोकलेनच्या साहाय्याने मोकळे करण्यात आले आहे. आगामी पावसाळ्यात शहरात पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये, या दृष्टिकोनातून पालिका प्रशासन गेल्या काही दिवसांपासून एक्शन मोडवर आहे. मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या मार्गदर्शनात मान्सूनपूर्व कामे सुरू आहेत.
शहरातील नाल्यामध्ये अडकलेल्या घाणीमुळे शहरातील पावसाचे पाणी जाताना अडथळा निर्माण होवू नये, पावसाळ्यात नालीच पाणी रस्त्यावर येवून शहर घाण होवू नये यासाठी पालिकेची यंत्रणा टाईट झाली आहे. कर्तव्यावर तत्पर राहून बीड नगर पालिकेच्या मुख्याधिकारी निता अंधारे यांनी शहरातील घाण कढण्यासाठी यंत्रणा सक्षम करत रात्रदिवस शहर स्वच्छतसाठी काम करत असल्याचे दिसून येत आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी निता अंधारेंच्या उत्कष्ट कामामुळे शहरातील नागरिक समाधान असल्याचे दिसून येत आहे.
सध्या पावसाळा तोंडावर आला आहे. जोरदार पासून झाल्यानंतर शहरातील नाल्या साफ न केल्यास नालीचे घाण पाणी रस्त्यावर येत नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत शहरत घाण पसरली जाते. यामुळे शहरातील नागरिकाच्या आरोग्याची तसच शहर स्वच्छ राहव यासाठी कायम तत्पर राहन काम करणाऱ्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी निता अंधारे यांनी आपली यंत्रणा टाइट करत शहरातील सर्वच नाल्या साफसफाईचे काम जोमात सुरू असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शहरातील घाण बाहेर काढली जात असल्याने पावसाळ्यात नागरिकांना संघर्ष करावे लागणार नाही. पावसाळ्यापूर्वीच शहरातील घाण बाहेर काढण्यासाठी नगर पालिकेची टीम अहोरात्र काम करात असल्याने शहरातील बहतांश भागातील नाल्या साफ करण्यात आल्या आहेत. यामुळे मोठया प्रमाणात पडलेल्या पावसामध्येही नालीचे पाणी रस्त्यावर येणार नाही अशी सायकली असल्यान बीड शहर स्वच्छ राहणार असल्याचे दिसून येत आहे.