गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतिदिवस : राज्यभरातील हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : मी आज 3 जून 2023 पर्यंत ज्या भूमिका जाहीरपणे मांडल्या त्याच भूमिकेशी मी ठाम आहे. अनेक लोक निवडणूक हरले, मात्र त्यांना संधी दिली गेली. गेल्या चार वर्षात दोन डझन आमदार-खासदार झालेत. त्याला मी पात्र होत नसेल तर लोक चर्चा करणारच. माझे नेते अमित शाह आहेत. मी यांच्याशी मनमोकळं बोलणार आहे,’ असे विधान पंकजा मुंडे यांनी शनिवारी केले.
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज 3 जून रोजी स्मृति दिवस होता. याप्रसंगी गोपीनाथ गडावर उपस्थित हजारो कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करीत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. यावेळी माजी महसुल मंत्री एकनाथ खडसे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, माजी आमदार पाशा पटेल, खासदार प्रीतम मुंडे आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, 19 वर्षांपासून मी राजकरणात आहेत. मात्र, गेल्या पाच वर्षांत खूप अनोखे अनुभव आले. गोपीनाथ मुंडे यांना अपेक्षित राजकारण करू शकणार नाही. ज्या दिवशी मी समोरच्या माणसाला आवडणार नाही, असे बोलणार नाही त्या दिवशी मला राजकारण करण्याचा अधिकार राहणार नाही. मी माझी भूमिका हजार वेळा मांडली. परत भुमिका मांडावी असे माझे लेचेपेचे शब्द नाहीत. माझे शब्द ठाम आहेत. ‘‘मला भूमिका घ्यायची असेल तर पंकजा मुंडे अशीच सर्व माध्यमांना बोलावेल आण िसमोर बसून बिनधास्त भूमिका जाहीर करेन.
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीची जोरदार चर्चा आहे. त्यांच्या पक्षांतराबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. विरोधकांकडून याच मुद्द्यावर भाजपावर टीका होत आहे, तर दुसरीकडे भाजपा नेत्यांकडून पंकजा मुंडे नाराज नसल्याचा दावा केला जात आहे. अशातच आता स्वत: पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावर भाषण करताना या घडामोडींवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. पंकजा मुंडे म्हणाल्या. मी राजकारणात आहे ते केवळ आणि केवळ लोकांसाठी आहे. मी माझ्या परिवाराचं भलं करण्यासाठी नाही. मी माझ्या स्वत:च्या कुठल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नाही. मी लोकांसाठी आहे.
नामांतराची चळवळ, ओबीसी आरक्षणाची चळवळ या पक्षाच्या भूमिका नसताही मुंडे साहेबांनी यात स्वत:ची आपली भूमिका घेतली होती. मराठा आरक्षण देण्यासाठी मुंडे साहेबांनी जाहीर पाठिंबा दिला होता. त्यामुळं भूमिका या समाज हिताच्या घ्यायच्या असतात. कुणाला आवडेल त्या भूमिका घेणारी व्यक्ती एखादेवेळी आमदारकी खासदारकी राज्यमंत्री मंत्रीपद घेऊ शकतो पण तो नेता होऊ शकत नाही. पंकजा मुंडे जी भूमिका घेईल ती छातीठोकपणे घेईल. आणि आज 3 जून 2023 पर्यंत ज्या भूमिका मांडल्या त्याच्याशी प्रामाणिक राहील, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.