माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून 13 कोटी 63 लाख मंजूर; वर्क ऑर्डर निघाली
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : शहरातील सुसज्ज नवीन बस स्थानक (central Bus Stand beed) उभारणीसाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून 13 कोटी 63 लाख रुपये मंजूर झाले असून निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे या कामाची वर्क ऑर्डर निघाली असून अखेर या कामाला मुहूर्त मिळाला आहे, शहरातील या बसस्थानक साठी सातत्याने प्रयत्न सुरू होते आता हा प्रश्न मार्गी लागल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
बीड शहरातील बस स्थानकाची दुरावस्था झाली असून या ठिकाणी नवीन बस स्थानक उभारणी करण्यात यावी अशी मागणी आणि गरज लक्षात घेता माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी नवीन अद्यावत बस स्थानकासाठी प्रस्ताव दाखल केला होता, त्यासाठी 13 कोटी 63 लाख निधी मंजूर करण्यात आला, त्यानंतर या स्थानकाचे दोन वेळा उद्घाटनही करण्यात आले होते, या ठिकाणी बस थांबे, डेपो आणि सुसज्ज असे ऑफिस असा आराखडा तयार करून कामाला सुरुवात होणार होती मात्र मध्यंतराच्या काळात हे काम थांबले होते बीड बस स्थानकाची जागा इंडियन रेल्वे आणि एस.टी. महामंडळ यांच्या नावे होती मात्र माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ही जागा बस स्थानकासाठीच मंजूर करून घेतली त्यामुळे या ठिकाणी हे बस स्थानक उभारण्यात आले होते. वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता या ठिकाणी नवीन बस स्थानक होणे गरजेचे झाले असून प्रवाशांना अनेक सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे, स्थानक मोडकळीस आले आहे, तर काहि ठिकाणी पडझड देखील झाली आहे, त्यामुळे या ठिकाणी नवीन बस स्थानकाची उभारणी करण्यात यावी अशी मागणी करून प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.
या प्रस्तावामध्ये विभाग वार बस थांबे, सुसज्ज ऑफिस आणि एस.टी. डेपोचा समावेश आहे. या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध होणार असून या नवीन बस स्थानकासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पाठपुरावा करून 13 कोटी 63 लाख रुपये मंजूर करून घेतले आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून वर्क ऑर्डर देखील निघाली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे हे बस स्थानक झाल्यास बीड शहरातील प्रवाशांचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
बीडचे बसस्थानक हे मरावाड्याचे मध्यवर्ती ठिकाणी असून येथून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते, मात्र पावसाळ्यात या ठिकाणी तलावाचे स्वरूप दिसते, ग्रामीण भागातील बस स्थानकाप्रमाणे बीडच्या बस स्थानकाची अवस्था झाली असून आता हे काम झाल्यावर सुसज्ज बस स्थानक उभारलेले दिसणार आहे.