गुन्हा दाखल होताच अवघ्या चार तासांत आरोपी अटकेत
बीड : एका तरूणाला गावठी पिस्टल आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवून अपहरण करीत 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना बीड शहरात बुधवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दोन तरु णांविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला घातक शस्त्रासह ताब्यात घेतले.
आरोपी मनीष प्रकाश क्षीरसागर (23, रा. बीड) आणि शैलेश संतोष गिरी (23, रा. बीड) या दोघांनी पैसे देण्याच्या बहाण्याने जय विशाल हजारी (19, रा. बार्शी रोड, बीड) याचे मोटारसायकलवरून अपहरण केले आणि गावठी पिस्टल व धारदार शस्त्राचा धाक दाखवत लोखंडी रॉडने पायात वार करून जीवे मारण्याची धमकी दिली.
या संदर्भात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चार तासांत दोन्ही आरोपींना गावठी पिस्टल आणि धारदार शस्त्रांसह ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश वाघ, पीएसआय संजय तुपे, रामदास तांदळे, बाळकृष्ण जायभाये, मारु ती कांबळे, राजू पठाण, गणेश हांगे, अर्जुन यादव, चालक अतुल हराळे यांनी केली. बीड शहरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.