तेली समाजाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात सोमाभाई मोदी यांचे विचार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड़ : देशभरातील सर्व तेली समाज एकत्रओळखला जावा यासाठी समाजबांधवांनी मोदी आडनाव धारण करावे असा सल्ला राष्ट्रीय महासंमेलन चे अध्यक्ष सोमाभाई मोदी यांनी दिला. तर, अखिल भारतीय साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांनी तेलगाणी बोर्ड चे गठन व्हावे व केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करावी अशी आग्रही मागणी केली.
समस्त गुजराती मोढ मोदी समाजाचे दोन दिवसाचे राष्ट्रीय अधिवेशन 20 आणि 21 मे रोजी संपन्न झाले. या अधिवेशनासाठी देशभरातुन तेली समाजाचे खासदार, आमदार व प्रमुख व्यवस्थापक यांच्यासह महत्त्वपूर्ण पदाधिका-यांची उपस्थिती होती. पहिल्या दिवशी अखिल भारतीय तैलिक साहू महासभा नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कार्यकारिणी ची बैठक माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यांनी केंद्र आण िराज्य सरकार च्या वतीने तेलगाणी बोर्ड चे गठन व्हावे व केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करावी अशी ही मागणी केली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून समाजाचे सोमा भाई मोदी उपस्थित होते.त्यांनी समाजाचे संघटन व्हावे ही अपेक्षा व्यक्त केली.
अखिल भारतीय साहू महासभा नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर प्रभावशाली पद्धतीने समाजाच्या विविध मागण्या मांडल्या. पुढे ते म्हणाले की, तेली समाज हा भाग्यशाली आहे. ओबीसी समाजामध्ये तेली समाज हा पूर्ण देशांमध्ये जवळपास 14 करोड आहे. तर आरक्षणाचा विचार केला असता ओबीसी ला 27 टक्के आरक्षण मिळते असे त्यांनी मत व्यक्त केले. देशामध्ये 52 टक्के ओबीसीची संख्या आहे.ओबीसींचा सेन्सेक्स पुन्हा होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्यांची लोकसंख्या जास्त सत्तेमध्ये त्यांनाही भागीदारी त्या प्रमाणात मिळाली पाहिजे. तेली समाजाची 14 करोड लोकसंख्या असताना त्या प्रमाणामध्ये राजकीय उमेदवारी मिळणे अपेक्षति आहे.
महासंमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून देशाचे गृहमंत्री श्रीमान अमित शहा उपस्थित होते त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, तेली समाजाने भारताला एक महत्त्वाचा नेता नरेंद्र मोदी यांच्या स्वरूपात दिला आहे.जो आज देशातील सर्वसामान्य व गरीब लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्य करत आहे त्यांच्या तोडीचा अन्य कोणताही नेता नसल्याचे त्यांनी सांगितले त्यांनी अखिल भारतीय शाहू महासभेचे अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांची मागणी संपूर्ण भारतभर तेली समाजाला राजकीय भागीदारी मिळावी अशी मागणी केली. त्या पद्धतीने निश्चितच त्यांना संधी मिळेल कारण भारतातील प्रत्येक राज्यात तालुक्यात भारतीय जनता पार्टी मध्ये तेली समाजाचा कार्यकर्ता सोबत असेल तर संपूर्ण समाज एका उद्देशाने प्रेरित होऊन काम करतो असे सांगितले.यावेळी विजुताई महिंद्रे, डॉ.अरुण भस्मे यांच्यासह विविध राज्यातून पदाधिकारी उपस्थित होते.