शेख निजामसह अनेक समर्थकाच्या स्वागताने नेते भाराऊन गेले
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : मुस्लीम अल्पसंख्याक समाजामध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पार्टीची क्रेझ वाढली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री असतांना उध्दव ठाकरे यांनी घेतलेले निर्णय आणि धर्मनिरपेक्ष भुमिकामुळे मोठ्यासंख्येने मुस्लिम समाज जोडला गेल्याने शिवसेनेची ताकद वाढली आहे. शनिवारी महा प्रबोधन सभा निमित्त प्रवक्ते मा. संजय राऊत, उपनेत्या सुषमाताई अंधारे बीडमध्ये दाखल होताच बार्शी नाका येथे शिवसेना नेते शेख निजाम सह जवळपास तीनशे वर समर्थकांनी त्यांचे केलेले जंगी स्वागत हे शिवसेनेची वाढती ताकद सांगुन जाते.

शिवबंधन हाती बाधल्यानंतर शेख निजाम यांनी शिवसेना चे प्रवक्ते मा. संजय राऊत, उपनेत्या सुषमाताई अंधारे, जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम समाजातील मोठी फळी शिवसेनेच्या पाठीशी उभी केली आहे. निजाम भाईंनी ज्या पध्दतीने संघटन बांधणी करून तळागाळातील मुस्लीम समाजापर्यंत उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पोहचवले. त्यामुळे अल्पसंख्याक समाज शिवसेना ठाकरे गटाशी जोडला जात आहे.
शेख निजाम यांचा 2016 च्या नगर पालिका निवडणूकीत नगराध्यक्ष पदाच्या लढतीत निसटता पराभव झाला होता. मात्र आता शिवसेनेत प्रवेश केल्याने शेख निजाम यांना हत्तीचे बळ मिळाले आहे. आगामी नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात मुस्लीम चेहरा असलेल्या शेख निजाम यांना संधी दिल्यास त्याचा फायदा पक्षाला मोठ्या प्रमाणावर होईल हे निश्चित.
शेख निजाम यांची मातृभाषा उर्दू असुन मराठी भाषा लिहिण्या बोलण्यावर ही त्यांचे मोठे कमांड आहे. त्ंयाना बीड शहर व नगर पालिकेची ही खडा न खडा माहिती आहे. एक अभ्यासु नेतृत्व म्हणून ते सर्वपरिचयाचे आहेत. काल शनिवारी महा प्रबोधन सभेत त्यांना बोलण्याची संधी मिळाली. तेव्हा त्यांनी मराठी भाषेतच आपले विचार मांडले. शिवसेनेने शेख निजाम यांना जिल्हा पातळीवर नेतृत्वाची संधी दिल्यास याचा फायदा निश्चितच होईल आणि ग्रामिण भागातील गटा-तटात विखुरलेला मुस्लिम समुदाय देखील शिवसेनेशी जोडला जाईल यात कोणतेही दुमत नाही.
