खा. प्रीतम मुंडे यांची ग्वाही : आझाद हिंद अल्पसंख्याक पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : अल्पसंख्याक तरु ण आता शैक्षणिक क्षेत्रातून पुढे येत आहेत. आझाद हिंद पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरार्थ्यांनी कठोर मेहनत घेउन आपले करीयर घडवावे व जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी केले. अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी मी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही ही मुंडे यांनी यावेळी दिली.
आझाद हिंद अल्पसंख्याक पोलीस शिपाई भरती पूर्व प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन रविवारी (दि. 30) खासदार डॉ. प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अल्पसंख्याक नेते सलीम जहांगीर, प्रा. नागरगोजे, काझी नजीब, महादेव मुंडे, नूर लाला, शेख इर्शाद बिल्डर, गणेश पुजारी, संस्था सचिव शेख मुसा आदी उपस्थित होते. यावेळी खा. मुंडे यांनी आझाद हिंद संस्था व संस्थेच्या पदाधिका-यांचे कौतुक केले.
यावेळी अल्पसंख्याक नेते सलीम जहांगीर म्हणाले की, सरकार अल्पसंख्याकांच्या हितासाठी योजना राबवत आहे. अल्पसंख्याक वर्ग पूर्वीपेक्षा अधिक जागृत झाला आहे. अल्पसंख्याक विकास योजनांचा लाभ मिळावा यासाठी मी प्रशासनस्तरावर प्रयत्नशील आहे. कार्यक्र माचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव शेख मुसा यांनी केले. यावेळी अल्पसंख्याक समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते एमपीएससी स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीत यश मिळविलेल्या अल्पसंख्याक युवक-युवतिंचा सत्कार करण्यात आला.