आंबेडकर चौक आणी नवी भाजी मंडई या दोन ठिकाणी पानपोई पूर्ण उन्हाळा पर्यंत चालू राहणार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : अल खैर फाउंडेशनकडून आंबेडकर चौक ( आठवडी बाजारात ) आणी नवी भाजी मंडई (पार्श्वभूमी जवळ) बीड येथे दोन ठिकाणी सार्वजनिक पाणपोई उभारण्यात आली आहे. 23 एप्रिल रोजी पार्श्वभूमी चे संपादक गमंत भंडारी सर , CNS GYM चे मालक डॉ इलियास सर , PC CARE चे मालक आमीर सर, शद्दो खान साहब , बिलाल खान, अल खैर फाऊंडेशन चे अध्यक्ष अझहर इनामदार सर यांच्या हस्ते पाणपोई चे उद्घाटन करण्यात आले.
सद्यस्थितीत कडक उन्हाळा सुरू असून अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे तहान जास्त प्रमाणात लागत आहे. डॉक्टरांकडूनही जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येत आहे. नागरिकांची गरज लक्षात घेता अल खैर फाउंडेशन ने येथील आंबेडकर चौक आणी नवी भाजी मंडई येथे ही पाणपोई सुरू केली आहे.
या वेळी उपस्थित मोमीन रजिउद्दिन, अजीम काझी, अजीम अली, जिशान खान, शेख रफत , साकिब सर, तौसीफ कुरेशी, यासेर खान,आमिर खान, शेख शाहीद आदी उपस्थित होते.ही पानपोई पूर्ण उन्हाळा पर्यंत चालू राहणार आहे. सामाजिक कार्य आणि आपसात बंधूप्रेम व्हावे यासाठी ही पाणपोई चालु करण्यात आली आहे. याचा फायदा मजूर, गोर गरीब, रोजदर, बाजारकरणाऱ्याना होणार आहे. या पाणपोई केंद्र वर दररोज 40 जार कॅन ठेवण्यात येणार आहे.