By MahaTimes ऑनलाइन |
बीड : मुस्लिम धर्मीयांसाठी पवित्र समजली जाणारी उमराह यात्रा करण्यासाठी आयशा टूर्सचा 60 यात्रेकरूंचा जत्था ( ग्रुप ) 15 दिवसासाठी ( शव्वाल उमराह सीजन ) काल बीडमधून रवाना झाला.
सोमवारी आयशा टूर्सचे बीड येथील मॅनेजर मोमीन मोहसीन यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधव पवित्र मक्का-मदीना Makka madina येथे उमराहसाठी umrah pilgrimage रवाना झाले. उमराह यात्रेला जाणाऱ्या बांधवांचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. ‘आमच्यासाठी दुआ करा’, असे म्हणून नातेवाईकांनी त्यांना निरोप दिला.
उमराह करण्यासाठी गेलेल्या बांधवांना आयशा टूर्स तर्फे सर्व सुविधा आणि सर्व व्यवस्था नियोजित असते. मुस्लिम बांधव आयशा टूर्स मार्फत उमराह करण्यासाठी प्राधान्य देऊ लागले आहे.