सर्व जातीधर्मातील नागरिकांची उपस्थिती, सामाजिक सलोख्याचा संदेश दिला
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : शहरातील सर्व मुस्लिम बांधवांसह सर्व जातीधर्मातील नागरिकांसाठी मिल्लिया कैंपस परिसरात रविवारी सायंकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तार पार्टी ने सामाजिक सलोख्याचा संदेश दिला.

शहरातील सर्व मुस्लिम बांधवांसह सर्व जातीधर्मातील नागरिकांसाठी मिल्लिया कैंपस परिसरात रविवारी सायंकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तार पार्टी ने सामाजिक सलोख्याचा संदेश दिला.सध्या मुस्लीम समाजाचा रमजान महिना सुरू आहे. याचे औचित्य साधून माजी आमदार सय्यद सलीम यांच्या वतीने रविवारी (ता. 16) इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक सलोखा नांदावा यासाठी भव्य प्रमाणात आयोजित या इफ्तार पार्टीत आमदार संदीप क्षीरसागर, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, माजी आमदार, सुनील धांडे, दिलीप गोरे, पप्पू कागदे, समीर काज़ी, अॅड शफीक भाऊ, रविंद्र दळवी, फरीद देशमुख, जैतूल्लह खान, अशफाक ईनामदार, वकील सर, शेरजमाखान, सिकंदर खान, अॅड यासेर पटेल, सलीम अध्यक्ष, मसूद खान, वरिष्ठ पत्रकार संतोष मानूरकर, शेखर कुमार, शेख तय्यब, वैभव स्वामी, काज़ी मगदुम, ख़मरुल ईमान खान, अबूबकर चाऊस, शेख मुजीब, भागवत तावरे, नखाते, रईस खान यांच्यासह सर्व जाती-धर्मांतील बांधव, रोजादार बांधव, सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
