मेंदू, मणका आणि नस विकारांचे मोफत तपासणी शिबीराचे शनिवारी आयोजन
बीड : जागतिक न्यूरोसर्जरी दिनाचे औचित्य साधून बीड शहरात रविवार (दि.9 एप्रिल) रोजी मेंदू, मणका आणि नस विकारावरील उपचारासाठीचे अद्यायावत असे विश्व हॉस्पिटल सुरू होत आहे. न्यूरोसर्जरीसाठीचे हे बीड शहरातील पहिले रूग्णालय असणार आहे. यानिमित्ताने 8 एप्रिल रोजी विश्व हॉस्पिटलमध्ये मेंदू, मणका आणि नस विकारांचे मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती विश्व हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉ.विशाल पिंगळकर यांनी दिली.
न्यूरोसर्जन असलेल्या डॉ.विशाल पिंगळकर यांनी बीडमध्ये विश्व हॉस्पिटलची उभारणी केली आहे. या ठिकाणी मेंदू, मणका आणि नस विकारावर अद्यायावत उपचार केले जाणार आहेत. जागतिक न्यूरोसर्जरी दिन (9 एप्रिल) चे निमित्त साधून या हॉस्पिटलचा शुभारंभ डॉ. संजय व्होरा व डॉ.राजश्री व्होरा यांच्या उपस्थितीत आणि प्रसाद महाराज अंमळनेरकर यांच्या हस्ते होणार आहे.
या शिबिरात अॅक्सीडेंटमुळे मेंदुला लागलेला मार, लकवा (पॅरालिसीस), मणक्याचे आजार, मान दुखी, पाठ दुखी, हातापायामध्ये बधीरपणा व मुंग्या येणे, मणक्याची गादी सरकणे, ब्रेन ट्यूमर, मेंदुमधील विविध प्रकारच्या गाठी, मणक्यात गॅप असणे, मणक्याची नस दबणे, शरिराची अर्धी बाजू कमजोर होणे, अर्धे डोके दुखणे (मायग्रेन), मिरगी/फिटस्/ झटक्याचे आजार, मेंदुमधील पाणी वाढणे, मेंदुचे इन्फेक्शन, लहान मुलांच्या पाठीवरील व मेंदुवरील जन्म गाठी आदी आजारांची तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. रूग्णांनी 02442-295151 व 8208952442 या क्रमांकावर संपर्क साधून आपली नावनोंदणी करावी.
या शिबीरासाठी प्रथमच राज्यातील ख्यातनाम असे उपस्थित राहणार आहेत. एखाद्या शिबीराला एवढ्या मोठ्या प्रमाणावर मेंदू विकार तज्ञ उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ असल्याने याचा लाभ रूग्णांनी घ्यावा असे आवाहन विश्व हॉस्पिटलचे डॉ.विशाल पिंगळकर, डॉ.अविनाश देशपांडे, डॉ.स्वप्नजा पिंगळकर, डॉ.शरद सोनवणे, डॉ.केदार कावसनकर यांनी केले आहे.