उष्मघातापासून बचाव, लक्षणे व उपाययोजना
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : आगामी दिवसामध्ये उष्णतेची लाट जाणवू शकते, उन्हाळ्यात होणाऱ्या त्रासांपासून वाचण्यासाठी नागरीकांना सतर्क करण्यासाठी व विशेषत: उष्ण वातावरणात काम करण्याची गरज भासणाऱ्या व्यक्तींना आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन केले जाते आहे.

उष्मघाताची कारणे : यात उन्हामध्ये शारिरीक श्रमाचे, मजूरीचे कामे फार वेळ करणे, कारखान्याचे बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबध येणे. उष्मघाताची लक्षणे जाणवू लागल्यास तातडीने रुग्णाच्या शरीराचे तापमान खाली आणण्यासाठी जवळच्या रुग्णालयात उपचार करुन घ्यावेत. यासाठी उष्माघात उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात सज्जता ठेवण्यात यावी, अशा सूचना देखील जिल्हाधिकारी दिपा मुंडे यांनी दिल्या आहेत.या उष्णतेच्या काळात उष्मघात होऊ नये. यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे गरजेचे आहे.
उष्मघाताची लक्षणे : शरीरास घाम सुटणे, तहान लागणे, शरीर शुष्क होणे, ताप येणे (102) पेक्षा जास्त त्वचा कोरडी पडणे, भुक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन, अस्व्स्थ, बेशुध्द अवस्था उलटी इत्यादी होणे.
जोखमीचे गट : वय 5 वर्षापेक्षा कमी व 65 वर्षापेक्षा जास्त, कष्टाची सवय नसणारे लोक, धुम्रपान, मद्यपान करणारे आणि कॉफी पिणारे व्यक्ती, मुत्रपिंड,-हदयरोग,यकृत, त्वचा विकार लठ्ठपणा, मधूमेह, उच्च रक्तदाब इत्यादी रुग्ण. Diuretice anti allergie trangilzers stimulants ete या औषधाचे सेवन सुरु असलेले रुग्ण, जास्त् तापमान, अति आद्रता, वातानुकलनाचा अभाव, तंग कपडे, शेत काम, कारखान्यातील काम ऊन आणि उष्णतेशी संबधीत व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती.
प्रतिबंधात्मक उपाय : वाढत्या तापमानाच्या वेळेत कष्टाची कामे टाळणे, कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावी, उष्णता शोषुन घेणारे कपडे उदा. काळया किंवा भडक रंगाचे कपडे वापरु नयेत. सैल व उष्णता परावर्तित करणारे पांढ-या रंगाचे कपडे वापरावेत. जल संजीवनीचा वापर करावा, पाणी भरपूर प्यावे. सरबत प्यावे, उन्हामध्ये काम टाळावे व सावलीत विश्रांती घ्यावी. शक्यतो उन्हात फिरण्याचे टाळावे. आवश्यकता असल्यास उन्हात जाण्यापूर्वी भरपूर पाणी प्यावे. किंवा लिंबू शरबत प्यावे. उन्हात जाण्या आगोदर जेवन करावे, रिकाम्या पोटी उन्हात जाऊ नये. कान व डोक्याचा उन्हापासून बचाव करणे आवश्यक आहे. डोक्याभोवती पांढरा रुमाल गुंडाळावा. गॉगल्स व हेलमेट वापरवी. वृध्दांना व बालकांना उन्हात फिरु देऊ नये.
उपचार : रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावीत शक्यतो वातानकुलीत खोलीत ठेवावेत. रुग्णाच्या शरिराचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. रुग्णाला बर्फाच्या पाण्याने अंघोळ घालावी. रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवाव्या. आईसपॅक लावावेत, ओआरएस सोल्युशन द्यावे. उन्हाळ्यामुळे उष्माघाताचे रुग्णावर उपाययोजना करण्यासाठी व मृत्यू टाळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांनी, कुटीर रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांनी आवश्यक ती सर्व तयारी ठेवण्याबाबत कळविण्यात आले आहे. उदा. हवेशीर खोली, पुरेशी औषधी, सलाईनचा साठा, खोलीत पंखे, कुलर इत्यादी सुस्थितीत ठेवावी. बर्फाच्या उपलब्धतेसाठी फ्रिज सुस्थितीत असणे आवश्यक आहे. उष्मघाताची कारणे लक्षणे प्राथमिक उपचार त्याचप्रमाणे उष्मघात होऊ नये म्हणून घ्यवयाची काळजी याची माहिती आरोग्य शिक्षणाव्दारे प्रचार माध्यमातुन द्यावी.
हे करा : तहान नसली तरी भरपूर पाणी,सरबत प्यावे, हवा खेळती राहण्यासाठी पंख्याचा वापर करावा, सैल व सौम्य रंगाचे सुती कपडे वापरावेत, सावलीत थांबणे, हळुवार चालावे, टोपी, फेटा चष्मा वापरणे, मजूर वर्गास वारंवार विश्रांती घेवु द्यावी, उन्हातुन आल्यावर चेह-यावर ओले कापड ठेवावे.
हे करू नका : मद्य, सोडा, कॉफी, अती गार पाणी आदी पिणे टाळावे, गरज नसतांना उन्हात फिरणे, तंग व गडद कपडे वापरणे, सवय आहे. म्हणून उन्हात निघणे, अति व्यायाम करणे, बंद कारमध्ये राहणे, अति शारिरीक कष्टाचे कामे करणे. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये. दुपारी 12. 00 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे. तसेच मोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी. अगदी साध्या व सोप्या उपाययोजनांव्दारे आपण उष्माघातापासून आपले संरक्षण करु शकतो असे ही माहिती प्रसिध्दीस देताना निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी कळविले आहे.
