जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : शहरातील प्रसिध्द संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गुरूवारी (दि.23) रोजी हाडांच्या आजारांची मोफत तपासणी व बी.एम.डी. टेस्ट शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हाडाची ठिसुळता ही वयाच्या चाळीशीनंतर स्त्री व पुरु ष या दोघांमध्ये आढळते. हाडाची ठिसुळता म्हणजे हाडांतील कॅल्शिअम कमी होऊन हाडे ठिसूळ व कमकुवत बनतात आणि यामुळे पुढे वरचेवर फ्रॅक्चर व सांधेदुखीचे वयाबरोबर वाढलेले प्रमाण वाढते. स्त्रीयांना रजोनिवृत्तीनंतर वाढत्या वयाबरोबर हाडातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी झालेले आढळते. याच पार्श्वभूमीवर संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने छत्रपति शिवाजी महाराज पुतळा जवळ (एसपी ऑफिस समोर) बीड येथे गुरूवारी 23 मार्च रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वा. दरम्यान मोफत हाडांच्या आजारांची तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे.
सदर शिबिर निष्क्रिय जीवन शैली, सांधेदुखी व पाठदुखीने त्रस्त रोगी, खुप दिवसांपासुन औषधगोळ्या घेत असलेले रूग्ण, 40 वर्षाच्या पुढील महिला-पुरूष यांच्यासाठी उपयुक्त आहे. या मोफत शिबिरात नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने केले आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02442225678 वर संपर्क साधावा.