केज तालुक्याच्या सावळेश्वर पैठण येथील दुर्दैवी घटना
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना युसूफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीतील सावळेश्वर पैठण (ता. केज) येथे मंगळवारी दुपारी घडली. तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सावळेश्वर पैठणमध्ये शोककळा पसरली आहे.

केज शहरापासून जवळच असलेल्या सावळेश्वर पैठण येथील स्वराज जयराम चौधरी (वय 7), पार्थ श्रीराम चौधरी (वय 8) आणि कानिफनाथ गणेश चौधरी (वय 7) ही तिन्ही निरागस मुले गणेश चौधरी यांच्या शेतात सिंचनासाठी केलेल्या शेततलावात आंघोळ करायला गेले होते. दरम्यान त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक योगेश उबाळे यांनी आपल्या कर्मचºयांसह घटनास्थळ गाठले. मृतदेह बाहेर काढून पंचनामा करून युसूफ वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
