या निवडीचे सर्व स्तरातुन स्वागत
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या जिल्हाध्यक्षपदी पठाण अमरजान यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीचे सर्व स्तरातुन स्वागत होत आहे.
‘पत्रकार सुरक्षा कायदा लागू झालाच पाहिजे’ या प्रमुख मागणी दृष्टिक्षेपात ठेउन पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कार्य करणाऱ्या अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र अध्यक्ष दिलशाद एस खान यांनी येथील सा.माझी नगरीचे संपादक पठाण अमरजान यांची समितीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर करीत तशा आशयाचे नियुक्तीपत्र दिले आहे.
यावेळी पत्रकार सर्वश्री सुनील जाधव, रोहित धुरंदरे, शेख फारूक, शेख जहीर, सय्यद मिनहाजोद्दीन, किशोर सोनवणे, नवीद इनामदार, समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी पठाण यांचे स्वागत करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.