जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाला देणार भेट, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले शुक्रवारी (दि.10 मार्च) बीड (धावती भेट), उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान, सकाळी 10 वाजता ते बीड शहरातील मध्यवर्ती कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. अशी माहिती युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी दिली.
रिपाइं चे पप्पू कागदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले शुक्रवारी एका कार्यक्रमानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. औरंगाबादहून बीडमार्गे ते उस्मानाबाद जाणार असुन दरम्यान सकाळी 10 वाजता रिपाइंच्या बीड मध्यवर्ती कार्यालयाला खास भेट देणार आहेत.
यावेळी ते कार्यकर्त्यांशी स्थानिक सामाजिक व इतर विषयांवर चर्चा करण्यात येणार असून त्यानंतर ते उस्मानाबादकडे रवाना होतील, त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती पप्पू कागदे यांनी दिली.