By MahaTimes ऑनलाइन – बीड |
कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता फ्रंटलाईन वर्कर्स आणि जेष्ठ व्यक्तींना बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 60 वर्षांवरील वृद्ध व्यक्ती ज्या इतर गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत, ते बूस्टर डोस घेऊ शकतात. मात्र त्यांना को-मॉर्बिडीटी सर्टिफिकेट दाखवावं लागेल.

को-विन संचालनचे प्रमुख आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे CEO डॉ. आरएस शर्मा यांनी बोस्टर डोससाठी वृद्धांना मेडिकल सर्टिफिकेटची आवश्यकता असेल. ज्यांना कोमॉर्बिडीटी आहे अशा 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे व्यक्ती बूस्टर डोससाठी पात्र आहेत, डोस घेण्यासाठी त्यांना मेडिकल सर्टिफिकेट दाखवावं लागेल. बाकी लसीकरणाची प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच असणार आहे.
कोविन-अॅपवर मिळेल सर्टिफिकेट
कोविन-अॅपवर संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. ज्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत बूस्टर डोससाठी पात्र आहेत, त्यांना https://www.cowin.gov.in/ या संकेतस्थळ वर को-मॉर्बिडीटी सर्टिफिकेट मिळू शकतं. सदर सर्टिफिकेटवर रजिस्टर मेडिकल सराव करणाऱ्या डॉक्टरची स्वाक्षरी आवश्यक आहे. त्याची हार्ड कॉपी देखील लाभार्थी लसीकरण केंद्रात घेऊन जाऊ शकतात. त्यानंतरच त्यांना तिसरा डोस देण्यात येईल. असे ही डॉ. शर्मा म्हणाले.