नेहाताई क्षीरसागर यांची रूपालीताई सोबत महिलांच्या समस्यावर चर्चा घेतले मार्गदर्शन
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर बुधवारी बीड जिल्हा दौऱ्यावर आल्या असता आ.संदीप क्षीरसागर यांच्यावतीने सौ.नेहाताई संदीप क्षीरसागर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी नेहाताईनी महाराष्ट्रातील महिलांच्या समस्यावर रूपालीताई सोबत चर्चा करून मार्गदर्शन घेतले.
राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष झाल्यापासून रूपालीताई चाकणकर यांनी महिलांना न्याय मिळवुन देण्यासाठी आक्रामक भूमिका घेतली. ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम चालवुन त्यांनी जास्तीत जास्त महिलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. महिलांची समाजामधील स्थिती आणि प्रतिष्ठा सुधारण्यासाठी ते प्रामाणिकपणे काय करीत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील युवती आणि महिलांना खूप मोठा आधार मिळाला असून रूपालीताईमुळे राज्य महिला आयोगाची ओळख देशभरात होत आहे. अशी प्रतिक्रिया सौ.नेहाताई क्षीरसागर यांनी व्यक्त करून रूपालीताईचे कौतुक केले.
रु पाली चाकणकर यांची आक्र मक नेत्या अशी ओळख आहे. त्या महिलांच्या प्रश्नांवर नेहमीच आक्र मक राहिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनेही झाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची महिला आघाडी सक्षम करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. दौंडमधील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रु पाली चाकणकर यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा राहिला आहे. नगसेविका ते राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असा त्यांच्या यशाचा आलेख चढता राहिला आहे.