जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठानचा पुरस्कार वितरण सोहळा
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : प्रत्येक महापुरुषांनी आपल्या कार्यकाळात समाजासाठी जीव ओतून काम केलेले असते अशा महापुरुषांचा इतिहास आपल्या पिढीला प्रेरणादायी असतो असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले. राजे यशवंतराव होळकर जयंती निमित्त राज्यस्तरीय यशवंत रत्न पुरस्कार व राजे यशवंतराव होळकर आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा रविवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडला. जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे होते.
यावेळी होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर, प्राध्यापक सर्जेराव काळे, इंजी.विष्णू देवकाते, डॉ.योगेश क्षीरसागर, बाळासाहेब दोडताले, डॉ.शिवाजी राऊत आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र गाडेकर यांनी केले व सुत्रसंचलन प्रा.श्रीराम जाधव यांनी केले तर चंद्रकांत भोंडवे, अॅड.राजू शिंदे, प्रा.भास्कर चादर, भगवान माने, प्रा.नामदेव चांगण, प्रा.चंद्रकांत चाळक, इंजि.नितीन गोपन, सत्यनारायण ढवळे आदींनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त मान्यवरांना पुरस्कार वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी मंत्री क्षीरसागर म्हणाले, की प्रत्येक महापुरुषांनी समाजासाठी मोठे योगदान दिले आहे त्यांच्या योगदानाची प्रेरणा घेऊनच अनेक पिढ्या घडल्या आहेत. महापुरुषांचा इतिहास हा प्रेरणादायी असतो, पुरस्कार देताना त्यांचे नाव दिले जातात त्यामुळे या पुरस्काराची महत्त्व खूप मोठे असते. गेल्या सहा वर्षापासून जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठान विविध क्षेत्रातील लोकांना पुरस्कार देतात. ज्यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो त्यांच्यासारखे कार्य घडावे हीच भावना यामागे असते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी जुन्या चालीरीती आणि जुन्या परंपरा मोडीत काढून समाजाला योग्य दिशा दिली. स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने काम करून स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करावे असा आदर्श अहिल्यादेवींनी समोर ठेवला आहे, त्यांची प्रेरणा आणि स्फूर्ती घेऊनच समाज घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
यावेळी हनुमंतराव काळे, फुलचंद बोरकर, अशोक नांदलगावकर, अंकुश निर्मळ, देवीदास शेंडगे, गणपतराव काकडे, प्रदिप रोडे, अंकुश येळे, सतीश खरात, विक्रम सोनसळे, डॉ. संतोष महानोर, गजानन काळे, किरण गावडे यांच्यासह समाज बांधव, महिला-पुरूषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.