चार संघांची सेमीफायनलमध्ये निवड, 2 जानेवारीला होणार फायनल सामना
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीड जिल्हा चार्टर्ड अकाऊंटन्ट व टॅक्स प्रॉक्टिशनर असोसिएशन व कुटे ग्रुपच्या वतीने आयोजित बीड प्रोफेशनल चॅम्पियन लिगमध्ये तिसर्या दिवशी उत्साही वातावरणात सामने खेळविण्यात आले. या सामन्यांमध्येही विजेत्या संघांतून मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले. यावेळी बीड जिल्हा चार्टर्ड अकाऊंटन्ट व टॅक्स प्रॉक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष सीए गोपाल कासट, सचिव सीए आदेश नहार, प्रोजेक्ट चेअरमन पंकज टवाणी, कोषाध्यक्ष ओमप्रकाश लोहिया, सीए प्रकाश नहार उपस्थित होते.

जिल्हा स्टेडिअम येथे सुरू असलेल्या बीड प्रोफेशनल चॅम्पियन लिगमध्ये आठ षटकांच्या झालेल्या सामन्यांत पहिला सामना वकिल संघ विरुध्द चार्टर्ड अकाऊंट संघ यांच्यात खेळविण्यात आला. यामध्ये वकिल संघाने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात वकिल संघाने धुवाँधार फलंदाजी करत 90 धावा केल्या तर दोन गडी बाद झाले. या संघाने प्रतिस्पर्शी चार्टर्ड अकाऊंट संघावर दोन धावांनी विजय मिळविला.
कलेक्टर ऑफिस संघ विरुध्द एसबीआय बँक संघात चुरशीचा दुसरा सामना झाला. यामध्ये एसबीआय संघाने 82 धावा केल्या तर 3 गडी बाद झाले. सात गडी राखून एसबीआयने सामना जिंकला. या संघाचे युवराज सर्जेराव पाटील यांना मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले.
पूर्णवादी क्रिकेट क्लब आणि रोटरी सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात रोटरी सुपर किंग्जने 48 धावा करत विजय मिळविला. रोटरीचे सतीश कैवाडे यांना मॅन ऑफ द मॅच जाहिर करण्यात आले. क्रेडाई रॉयल बिल्डर्सने 65 धावा काढून विजयश्री खेचून आणला. या सामन्यात क्रेडाईचा केवळ 1 गडी बाद झाला. यात मॅन ऑफ द मॅच अभिजीत चौरे यांना जाहिर करण्यात आले. पाचवा सामना महाराष्ट्र ग्रामीण बँक विरुध्द बीड ब्लास्टर्स संघ असा खेळविण्यात आला. यामध्ये बीड ब्लास्टर्सने 71 धावा 4 बाद करत विजय मिळविला. मॅन ऑफ द मॅच विजय पदमुले यांना घोषित करण्यात आले.
शेवटचा सामना आयटीजीएसटी एक्साईज ईगल्स आणि आयएमए युनायटेड यांच्यात झाला. या सामन्यात आयएमए युनायटेडने 55 धावा केल्या तर त्यांचे 3 बाद झाले. या संघाचे अभिषेक जाधव यांना मॅन ऑफ द मॅच जाहिर करण्यात आले.
2 जानेवारीला होणार सेमीफायनल
बीड जिल्हा चार्टर्ड अकाऊंटन्ट व टॅक्स प्रॉक्टिशनर असोसिएशन व कुटे ग्रुपच्या वतीने जिल्हा स्टेडिअमवर तीन दिवस झालेल्या बीड प्रोफेशनल चॅम्पियन लिगला शहरातून प्रचंड प्रतिसा मिळाला. या सामन्यांना पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींनी हजेरी लावली होती. दरम्यान तीन दिवस झालेल्या सामन्यांतून बीड ब्लास्टर, महाराष्ट्र ग्रामीण बँक इलेव्हन, कलेक्टर ऑफि स संघ व स्टेट बँक ऑफ इंडियन क्रिकेट संघ या चार संघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. 2 जानेवारी रोजी होणार्या सेमीफायनल मध्ये या चार संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. यातून दोन विजेत्या संघांमध्ये फायनल सामना रंगणार आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत विजेता संघाला पारितोषिक वितरण तसेच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात येणार आहेत.