राज्य उपाध्यक्ष डॉ. प्रमोद शिंदे यांचा पदग्रहण सोहळा संपन्न
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
गोवा येथे नुकत्याच झालेल्या भारतीय अस्थीरोग संघटनेच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये बीड अस्थीरोग संघटनेला राज्यस्तरीय उत्कृष्ट शाखा पुरस्कार( बेस्ट ब्रँच अवॉर्ड) प्राप्त झाला आहे. या परिषदेचे राज्य उपाध्यक्ष डॉ. प्रमोद शिंदे यांनी आपला पदभार स्वीकारला व त्यांचा पदग्रहण सोहळा देखील पार पडला.

यावेळी डॉ. शिवशंकर, राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष, अस्थीरोग संघटना तसेच महाराष्ट्र अस्थीरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ.अजित शिंदे सचिव डॉ. एन जे करणे, इतर पदाधिकारी व भारतभरातील अस्थिरोग तज्ञ उपस्थित होते.
बीड अस्थिरोग संघटना नेहमीच अस्थिरोग तज्ञ साठी विविध शिबिरे, वर्कशॉप, सेमिनार आयोजित करत असते. सामाजिक उपक्रम देखील संघटनेच्यावतीने सतत राबवले जातात. बीड शाखेच्या या कार्याची राज्य स्तरावर दखल घेऊन महाराष्ट्र अस्थीरोग संघटना च्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट शाखेचा पुरस्कार बीडला मिळाला आहे. बीड अस्थीरोग संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर प्रमोद शिंदे, सचिव डॉक्टर एस एल अळणे, डॉक्टर प्रशांत सानप, डॉक्टर विश्वास गवते, डॉक्टर अभिनव जाधव, डॉक्टर आनंद वैद्य डॉ.गणेश देशमुख आणि सर्व सदस्य, सर्व पदाधिकारी यांनी विविध उपक्रम राबवले.
या पुरस्काराबद्दल सर्व पदाधिकारी व सदस्यांचा विशेष गौरवही करण्यात आला. या यशाबद्दल डॉक्टर टी एल देशमुख, डॉक्टर धायतडक, डॉक्टर विठ्ठल क्षीरसागर, डॉक्टर राजेंद्र भोरे, डॉक्टर अंशुमन बहिर, डॉक्टर कट्टे, डॉक्टर लांडगे, डॉक्टर अमित बायस, डॉक्टर प्रवीण देशमुख, डॉक्टर सुरेश मुंडे, डॉक्टर अमोल गीते, डॉक्टर लामतुरे, डॉक्टर शेंडगे डॉक्टर जुने डॉक्टर तोष्णीवाल डॉक्टर काकानी, डॉक्टर मधुसूदन काळे, डॉक्टर किशोर कोटेचा आणि सर्व अस्थीरोग तज्ञ यांनी स्वागत केले आहे.