अर्ज नामंजूर झाल्याने निराधारांनी खचून जावु नये, नव्याने अर्ज करावेत -आ.संदीप क्षीरसागर
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : बीड मतदार संघात निराधारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. बीड मतदार मतदार संघातील संजय गांधी व श्रावण बाळ योजनेच्या लाभासाठी दाखलेले 9 हजार 42 अर्जांपैकी 1838 अर्ज मंजुर झाले असून अपुर्ण त्रुटीची संख्या 891 असून नामंजुर अर्जांची संख्या 7 हजार 204 आहे. तरी लाभधारकांनी व त्रुटी असलेल्यांनी तहसील कार्यालयातील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या कार्यालयात संपर्क साधून लाभ घ्यावा. अर्ज नामंजुर झाल्याने खचून जावु नये. नामंजूर अर्जांवर व अपुर्ण त्रुटी अर्जावर परत एकदा मी शासन दरबारी पाठपुरावा करणार असून असे आ.संदीप क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

बीड विधानसभा मतदार संघातील श्रावणबाळ योजनते शहरी भागातील 147 तर ग्रामीण भागातील 153 प्रकरणे मंजुर, नामंजूर प्रकरणे शहरी भाग 2218 व ग्रामीण भाग 4184, अपुर्ण त्रुटीच्या अर्जाची संख्या शहरी भाग 340 व ग्रामीण भाग 162 एवढी आहे तर संजय गांधी निराधार योजने मध्ये शहरी भाग 426 व ग्रामीण भाग 338 मंजुर झाले आहेत. तर नामंजुर प्रकरणे शहरी 442, ग्रामीण भाग 261, अपुर्ण त्रुटीच्या अर्जाची संख्या शहरी भाग 307 व ग्रामीण भाग 82 इतकी असून एकूण श्रावणबाळ व संजय गांधी योजनेमध्ये शहरी भागात 573 तर ग्रामीण भागात 491 अर्ज मंजुर करण्यात आले आहे. तर नामंजूर प्रकरणामध्ये श्रावण बाळ व संजय गांधी योजनेत शहरी भागात 2264, ग्रामीण भागात 4445 तर अपूर्ण त्रुटीमध्ये शहरी भागात 647 व ग्रामीण भागात 244 याप्रमाणे अर्ज बाद करण्यात आले असून एकूण दाखल केलेल्या 9042 प्रकरणापैकी श्रावणबाळ व संजय गांधी योजनेमध्ये बीड तालुक्यातील 1838 प्रकरणे मंजुर केले आहेत.
मंजुर झालेल्या अथवा अपुर्ण त्रुटी असलेल्या लाभधारकांनी तहसील कार्यालय बीड येथील संजय गांधी व श्रावणबाळ योजना या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि सदरील योजनेतील नामंजुर अर्ज असलेल्या निराधार माताभगिणी व बंधुंनी अर्ज नामंजुर झाल्याने खचून जावु नये कारण नामंजूर अर्जांवर व अपुर्ण त्रुटी अर्जावर परत एकदा मी शासन दरबारी पाठपुरावा करणार असून त्याचे काम सुरू आहे. कुठलाही निराधार या योजनेपासून वंचित राहणार असा माझा मानस असून नव्याने अर्ज दाखल करावे असे आवाहन आ. संदीप क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
