नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत आणि मावळते जिल्हाधिकारी शर्मा यांच्या निरोपाचा कार्यक्रम
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी आज जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्विकारला. मावळते जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आज त्यांच्याकडे जिल्ह्याच्या कारभाराची सूत्रे सुपूर्द केली. सुरुवातीला मावळते जिल्हाधिकारी शर्मा यांनी श्रीमती मुधोळ-मुंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तदनंतर पदभार हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडली.
शासनाच्या दृष्टीने महसुल विभाग हा अतिशय महत्वाचा आहे. बीड आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यांना एकाच तुलनेत पाहता येईल. भौगोलिक आर्थिकदृष्ट्या हे दोन्ही सारखेच आहेत. शासनाचे धोरण, काम करण्याचा अजेंडा देखील तितकाच महत्वाचा आहे. कॅपॅसिटी आणि क्रिएटीव्हिटीच्या माध्यमातुन कामाची संधी दिली जाईल. कामाच्या ठिकाणी काम, टाईमपास चालणार नाही असे स्पष्ट करत नुतन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ -मुंडे यांनी आपली भुमिका मांडली.
दिपा मुधोळ-मुंडे यांनी आज सकाळी पदभार स्विकारला. यावेळी जिल्हानियोजन समितीच्या सभागृहात नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत आणि मावळते जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या निरोपाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. मावळते जिल्हाधिकारी शर्मा यांना पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला. यावेळी शर्मा म्हणाले की, कधी ना कधी बदली होणार होती, त्यामुळे तशी मानसिकता ठेवली होती.
बदली झाल्याचे दुःख नाही मात्र बीड सोडणार याचे दुःख असल्याचे त्यांनी सांगितले. बीड हा अतिशय चांगला जिल्हा आहे. जिल्ह्याबाहेर बीडची जी प्रतिमा तयार करू ठेवलेली आहे तसा अनुभव कधीच आला नाही. प्रत्येकाने जबाबदारीने काम केले, दीड वर्षात बीडसाठी खुप काही करता आले. येथील लोकं सुध्दा चांगले आहेत. पुढाऱ्यांकडुन कधीच त्रास झाला नाही. त्यांचे कामचं आहे बोलणे तेही स्वतःसाठी नव्हे तर जनतेच्या कामासाठीच बोलतात, त्यामुळे त्याचे कधीच वाईट वाटले नाही असेही त्यांनी सांगितले.