By MahaTimes ऑनलाइन – बीड |
जगात नावाजलेला आंतर्रराष्ट्रीय बॉडी बिल्डर तथा फिटनेस मॉडेल सुपरस्टार जगातील करोडो युवकांच्या गळ्यातील ताईत जॉन लुकासच्या हस्ते सीएनएस फिटनेस रिनोवेशन आणि न्यूट्रेशन हब चा बुधवारी शानदार शुभारंभ झाला.

जिल्हयातील नावजलेल्या सीएनएस फिटनेस जीम चे संस्थापक संचालक डॉ. इलियास खान यांच्या निमंत्रण स्वीकारून तो साउथ आफ्रीका चा जॉन लुकास साता समुद्रापलीकडून बीड मध्ये आला होता. यावेळी त्याचे सीएनएस व बॉडी बिल्डरप्रेमीजनांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. सीएनएस फिटनेस रिनोवेशन आणि न्यूट्रेशन हब चा शुभारंभ ते शहरात रैली असा दिमाखदार कार्यक्रम निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी युवा नेता योगेश क्षीरसागर, डॉ. इलियास खान, सीएनएस जीम चे प्रशिक्षक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान जॉन लुकास ने सीएनएस जीम च्या अद्यावत व्यवस्था पाहुन समाधान व्यक्त केले. उपस्थितांना त्यांनी बॉडी बिल्डींग संबंधी मोलाचे मार्गदर्शन करण्याबरोबरच बीडला येउन, आपणांस भेटून खूप आनंद झाला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. डॉ. खान यांनी दुभाषिकाची भूमिका निभावली. जॉन लुकास जगातील टॉप च्या बॉडीबिल्डरर्स मध्ये त्याचा सुमार होतो. त्याचे शोशल मिडीया पर लाखो फॉलावर्स आहेत.
हे पहा फोटोज : Instagram John Lucas Click To View
Beed येथून रवाना होताच international body builder जॉन लुकास ने CNS च्या कार्यक्रमाचे फोटो आपल्या Instagram अकाउंट वर्ष शेयर केले.