उध्दव ठाकरे सह बड्या नेत्यांच्या उपस्थितीत ‘मातोश्रीवर’ हा प्रवेश सोहळा पार पडला
By MahaTimes ऑनलाइन |
मुंबई : एमआयएम चे माजी जिल्हाध्यक्ष शेख निजाम यांनी आज आपल्या समर्थकांसह शिवसेना (ठाकरे गट) पार्टीत जाहीर प्रवेश केला. खुद्द शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी निजाम यांच्या हाती शिवबंधन बांधले. त्यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात शिवसेनेला बळ मिळाले आहे.

बीड जिल्ह्यातील शेख निजाम यांच्या सहित अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे, बीड जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू दादा पाटील, बीड जिल्हा प्रमुख अनिल दादा जगताप यांच्या प्रमुख उपस्थित ‘मातोश्रीवर’ हा प्रवेश सोहळा पार पडला.

बीडमध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरू झालीय. एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष शेख निजाम जैनुद्दीन सह शिवसंग्राम चे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन शिवाजीराव धांडे, संभाजी ब्रिगेडचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष संतोष किसनराव जाधव, शिवसंग्राम चे शहर उपाध्यक्ष नंदकिशोर बापुराव पिंगळे, कामखेडा चे माजी सरपंच आयुब पठाण, माजी नगरसेवक हाफिज शेख अश्फाक, माजी नगरसेवक शेख अमर, माजी नगरसेवक शेख समियोद्दीन इनामदार, एमआयएम चे माजी शहर अध्यक्ष मोमीन जुबेर, युवक जिल्हाध्यक्ष एमआयएम शेख खय्युम इनामदार, सामाजिक कार्यकर्ता जयंत वाघ, सॉ मिल सघंटनेचे बीड शहर अध्यक्ष शेख कदीर, जी एन ग्रुप शेख नजीर सह पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून मुंबईतील मातोश्रीवर जाऊन प्रवेश घेतला. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह पक्षातील वरिष्ठ पदाधिकार्यांनी या बीडमधील ठाकरें गटात सामील झालेल्या मावळ्यांना प्रवेश दिला.यावेळी शिवसेनेचे शामराव पडुळे, सुनील अनभुले, नितिन भैय्या धांडे, अभिजीत बरीदे आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेख निजाम हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासुन होत होती. मात्र आज त्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह मुंबई येथे जाउन शिवेसेनेत जाहीर प्रवेश केल्याने होत असलेल्या चर्चेला विराम मिळाला आहे. दुसरीकडे निजाम यांचा प्रवेश एमआयएम साठी मोठा झटका मानला जात आहे.
