संत वामनभाऊ महाराज यांची 47 वी पुण्यतिथी साजरी
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : नाथ संप्रदायाचं आणि वारकरी संप्रदायाचं मूळ श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर आहे. देश, देव आणि धर्म वारकरी संप्रदायामुळे वाचला अशा या गहिनीनाथ गडाचा विकास आराखडा लवकरच पूर्ण केला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. पश्चिम वाहिनी नद्यांचे वाया जाणारे पाणी गोदावरीच्या खोर्यात आणून त्याचा फायदा मराठवाड्याला मिळणार आहे यासाठी वॉटर ग्रीड ही योजना मंजूर झालेली आहे या माध्यमातून मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील गिहनीनाथ गडावर आयोजित करण्यात आलेल्या संत वामनभाऊ महाराज यांच्या 47 व्या पुण्यतिथी कार्यक्र मात ते बोलत होते. या गडावरचा भगवा ध्वज हा नुसता ध्वज नसून ती एक मोठी जबाबदारी आहे. मी ती समर्थपणे पेलण्याचा प्रयत्न करणार आहे असं ही ते म्हणाले. श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या 47 व्या पुण्यतिथी महोत्सवास मंचावर महंत श्री. ह. भ. प. विठ्ठल महाराज, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आ. सुरेश धस,आ. बाळासाहेब अजबे, माजी आ. भीमराव धोंडे, आ. लक्ष्मण पवार, अक्षय मुंदडा, डॉ.योगेश क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, गहिनीनाथ गडावरील विकासाचा आराखडा पूर्ण केला जाईल. तसेच समुद्राला वाहून जाणारे हक्काचे पाणी वॉटर ग्रीड योजनेच्या माध्यमातून मराठवाड्याला दिले जाईल. या भगीरथ प्रयत्नासाठी संत वामनभाऊंनी आशिर्वाद द्यावा. गिहनीनाथ गडावरील भगवा ध्वज हा नुसता ध्वज नसून जबाबदारी आहे. ती समर्थपणे पेलणार आहे. इथे आल्यानंतर मराठवाड्याची पंढरी पाहायला मिळाली. मुंबईवरून हेलिकॉप्टरने येताना अरबी समुद्र पाहिला आणि इथं आल्यानंतर गिहनाथ गडावरील भक्तीचा समुद्र पाहायला मिळाला. देवाच्या मनात असेल तर तो दर्शनासाठी बोलावतो आज वामन भाऊंनी बोलावले म्हणून मी इथे आलो. नाथ आणि वारकरी संप्रदायाचे मूळ या पवित्र स्थानावर आहे. देश, देव आणि धर्म वारकरी सांप्रदायामुळेच वाचला. संस्कार आणि संस्कृती संवर्धनाचे काम वारकरी सांप्रदायाने केले. आद्य ठिकाण वसलेल्या गहीनाथगडाचा विकास आराखडा लवकरच पूर्ण केला जाईल असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
गहिनीनाथ गडाची ताकद फार मोठी -जयदत्त क्षीरसागर
यावेळी बोलतांना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, राज्यसत्ता आणि धर्मसत्ता दोन्हीही एकत्र आल्या आहेत. राजसत्तेकडून अन्न,वस्त्र, निवारा तर धर्मसत्तेकडून माणसाला माणूस जोडून समाज एकत्र आणण्याचे काम केले जाते. संत वामन भाऊआणि संत भगवान बाबा यांनी समाज जागृत करून वारकरी सांप्रदायाची पताका अटकेपार फडकावली आहे. मराठवाड्याचा विकास व्हावा यासाठी समुद्राला वाहून जाणारे पाणी मिळाले तर आमच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ नाहीसा होईल आपण पायाला चाके बांधून संपूर्ण राज्यात फिरताय आमच्या मराठवाड्याचा कायमस्वरूपी दुष्काळ मिटवण्यासाठी आपण पुढाकार घेतला आहे.
श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या 47वा पुण्यतिथी महोत्सवासाठी गहिनीनाथ गड (ता. पाटोदा, बीड) येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित.
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) January 15, 2023
यावेळी ह.भ.प विठ्ठल महाराज, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासह बीड येथील अनेक नेते-कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री यांचे स्वागत केले. pic.twitter.com/nO1I5rcV4E
20 हजार कोटीचा हा प्रकल्प आपण सोबत काम करत असतानाच मंजूर झालेला आहे. हा जर प्रत्यक्षात झाला तर पुढील अनेक पिढ्यांना त्याचा फायदा होईल आज गडावरील तिळाची ऊर्जा आणि गुळाचा गोडवा घेऊन आपण राज्यात कडू बोलणार्यांना हा प्रसाद द्यावा या गडाची ताकद फार मोठी आहे. या ठिकाणी मिळालेला आशिर्वाद आपल्या भावी काळासाठी नक्कीच उपयोगी पडणार असल्याचे सांगून श्री. संत वामनभाऊ महाराज यांची महती व गहिनीनाथ गडाची माहिती सांगत गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी 25 कोटी रु पये मंजूर झाले होते. त्यापैकी केवळ दोन कोटी रु पये मिळाले आहेत उर्वरित 23 कोटी रु पये मिळाले तर या ठिकाणी उपस्थित भाविकांच्या जनसमुदायांची व्यवस्था होईल असे सांगितले.