नागरिक व स्वयंसेवी संस्थांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी शर्मा; बीड शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडणार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : शहराच्या मधोमध वाहणाऱ्या बिंदुसरा नदीच्या स्वच्छता मोहिमेमध्ये नागरिक व स्वयंसेवी संस्थांनी सहभागी व्हावे, सगळ्यांच्या लोकसहभागातून ही मोहीम पूर्णत्वाला जाऊ शकते असे आवाहन स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे.
बीड येथीले सोमेश्वर मंदिराच्या नजीक पुलापासून जिल्हाधिकारी यांनी सकाळी आठ वाजता नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी व शासकीय यंत्रणेतील साधनसामग्रीसह थेट नदीपात्रात उतरून स्वच्छता करण्यासाठी आज साफसफाई सुरुवात केली. सोमेश्वर मंदिर पुलापासून सुरुवात झालेली मोहीम बीड शहरातील नदीचे पूर्ण पात्र स्वच्छ होईपर्यंत चालू ठेवण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न आहे. बीड शहराच्या सौंदर्यीकरणात करण्याच्या प्रयत्नांमध्ये यामुळे भर पडणार असून बिंदुसरा नदीच्या स्वच्छतेबरोबरच त्यातील पात्र खोलीकरण करण्याचा प्रयत्न देखील करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेनुसार मार्गदर्शक सूचनातून व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी यंत्रणेला सुसज्ज करत आज सोमेश्वर मंदिराला जवळील नदीपात्रात स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला. स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आज नगरपरिषद बीड आणि प्रशासनाच्या वतीने थेट मोहीम हातात घेतली. याप्रसंगी नदीची पाहणी करताच जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन मोहिमेस गती दिली.
यावेळी श्री शर्मा म्हणाले, बीड जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर बिंदूसरा नदीचे स्वतः स्वच्छता मोहीम राबविण्याची संकल्पना मनामध्ये होती ती प्रत्यक्षात उतरत असून नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती अंधारे यांना यासाठी सूचना करून स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे यासाठी शासकीय जेसीबी ट्रॅक्टर यंत्रसामुग्री अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग घेतला आहे. या मोहिमेत नगर परिषदेच्या माध्यमातून 200 कर्मचारी, दोन जेसीबी, 20 ट्रॅक्टर या स्वच्छता मोहिमेत तैनात होते. जिल्हाधिकारी शर्मा यांनी स्वतः उभे राहून बिंदुसरा पूला लगत व पात्रातील परिसराची पाहणी करत स्वच्छता करून घेतली.
मुख्याधिकारी श्रीमती अंधारे यावेळी म्हणाल्या बीड शहरातील नदीचे पूर्ण पात्र स्वच्छता होण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेमध्ये लोकसहभाग असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर निधीची उपलब्धता करण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. नदीमध्ये सोडण्यात येणारे बायोवेस्ट बंद करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी यावेळी सांगितले. नदीपात्रामध्ये स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.