पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण : विषय तज्ञ व प्रमुख पाहुण्या कडून मार्गदर्शन
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : अल खैर मल्टिपर्पज फाऊंडेशन तर्फे पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आज विषय तज्ञ व प्रमुख पाहुण्या कडून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सेमिनार घेण्यात आला व विद्यार्थ्यांना ड्रेस किट वाटप कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडला गेला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ मुजाहेद सर, कार्यक्रमाचे उद्घाटक वकील सर व प्रमुख पाहुणे म्हणून मुफ्ती माज सहाब, अॅड. अझहर अली साहेब, काझी मकदूम सहाब, भागवत तावरे साहेब, उमेर सलीम सर, पवार सर, सिराज भाई, विकार सर, डॉ शकील सर, अॅड जोहेब अली, अझहर इनामदार सर उपस्थित होते. या वेळी उपस्थित डॉ मुजाहेद सरानी विद्यार्थ्यांना सांगितले की स्पर्धा परीक्षा मध्ये विविध प्रकारचे परीक्षा दिल्या पाहिजे, थियरी क्लास बरोबर यूट्यूब वरून सुद्धा अभ्यास केला पाहिजे. स्वतः ला स्पर्धेत टिकवले पाहिजे.
ॲड अझहर अली, उमेर सलीम, पत्रकार भागवत तावरे, यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यासेर खान सर आणि आमीर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मोमीन रजी सर यांनी केले.
