3 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत आपले प्रवेश अर्ज सादर करून महोत्सवात सहभागी व्हावे – सुहासिनी देशमुख
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीडच्या वतीने 3 जानेवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुल, बीड येथे सकाळी 10 ते सायं. 6 या वेळेत जिल्हास्तरीय युवा महोत्सव सन 2022-23 चे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धकाचे वय दि. 2 जानेवारी 2023 रोजी 15 वर्षांपेक्षा जास्त व 29 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना आपली कला सादर करताना रेकॉर्डेड संगीत/गीत/वाद्य यांचा वापर करता येणार नाही. स्पर्धकांनी सादरीकरणासंबंधीचे साहित्य स्वत: आणावे लागेल. स्पर्धेत परीक्षकांनी दिलेला निर्णय अंतिम राहील.
बीड जिल्ह्यातील 15 ते 29 वर्षे वयोगटातील जास्तीत जास्त युवक व युवती, युवा मंडळे, संगीत विद्यालये व महाविद्यालये, इतर शैक्षणिक व व्यावसायिक संस्था, कला मंडळ यांनी स्पर्धकांनी दि. 3 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत जन्म तारखेच्या दाखल्यासह आपले प्रवेश अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड येथे सादर करून सदरील महोत्सवात सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास 8788085013 या भ्रमणध्वनी (WhatsApp) वर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुहासिनी देशमुख यांनी केले आहे.
कला प्रकार, सादरीकरणाची वेळ मर्यादा
लोकनृत्य : कलाकारांची संख्या -20 तर सादरीकरणाची वेळ मर्यादा 15 मिनिटे आहे. लोकगीत : कलाकारांची संख्या – 10 तर सादरीकरणाची वेळ मर्यादा 07 मिनिटे आहे.
