धांडे गल्ली तेरवी लाईन मित्र मंडळ चे आयोजन
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : नवनिर्वाचित सरपंचांना प्रोत्साहन भेटावे या हेतुने बीड शहरातील धांडे गल्ली तेरवी लाईन मित्र मंडळाच्या वतीने थाटामाटात त्यांचा सन्मान करण्यात आला. ग्रामीण भागातील युवा आणि कार्यक्षम नेतृत्वाला पाठबळ मिळावे यासाठी शहरी भागातील मित्र मंडळाने केलेला सत्कार कौतुकास्पदच म्हणावा लागेल.

धांडे गल्ली तेरवी लाईन मित्र मंडळाच्या वतीने रविवारी ( दि.25 ) रिपोर्टरचे संपादक शेख तय्यबभाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात मन्यारवाडीचे सरंपच भिकु शिंदे, घोसापुरीचे सरपंच शेख फारुक पटेल, बर्हाणपुरचे सरपंच गोरख शिंदे, ढेकनमोहाचे ग्राम पंचायत सदस्य प्रभुसिंह ठाकुर, घोसापुरीचे ग्रा.पं.सदस्य सुभाष जाधव यांच्यासह पत्रकारीतेतील आदर्श पुरस्कार प्राप्त पत्रकार अॅड. संदिप बेदरे आणि मोटार सायकलवरुन बारा ज्योतिर्लिंग यात्रा करुन महादेवाच्या चरणी लिन झालेले धनंजय कुलकर्णी यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी जेष्ठ शिवसैनिक सुरेश तात्या शेटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे झुंजार सेठ धांडे, युवा नेते मुकुंद भोसले, माजी नगरसेवक मुकुंद भालेकर, बाबा पंडित, बबन पवार,बाबुराव घोरपडे, लल्लू भाई, मधुकर धांडे, शिवाजी सुस्कर, माऊली तपासे, सुंदर भोसले, गणेश भालेकर, अंकुश आगळे, अमोल कुमकर, संदिप भोसले, आनंद शेटे, आशिष सोने, रविकांत बजगुडे, दिपक शेटे, रोहित ठाकूर, मनोज परदेशी यांच्यासह तेरवी लाईन भागातील नागरिक उपस्थित होते.
