जागीरदार यांची हैट्रिक तर, शेख यांना दुसऱ्यांदा संधी
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : येथील मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. डॉ. अताउल्ला जागीरदार यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शारीरिक शिक्षण अभ्यास मंडळावर तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे व ते मागील दहा वर्षापासून शारीरिक शिक्षण अभ्यास मंडळाचे अध्यक्ष राहिले आहेत. तसेच वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. शेख रफीक यांची दुसऱ्यांदा वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळावर निवड झाली आहे.

प्राध्यापक डॉ. अताऊल्ला जागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली 29 विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे तसेच त्यांचे 12 ग्रंथ (पुस्तके) व 100 पेक्षा जास्त रिसर्च पेपर प्रकाशीत झालेले आहेत. शैक्षणिक, संशोधन व सामाजिक क्षेत्रात आजपर्यंत त्यांचे उल्लेखनीय काम राहिले आहे. त्याबद्दल त्यांना विविध संघटना व संस्थांकडून आदर्श शिक्षक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. डॉ. शेख रफीक यांनी 20 पेक्षा जास्त रिसर्च पेपर व दोन पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. तसेच शैक्षणिक, संशोधन व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना विविध संघटना व संस्थांकडून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे.

या निवडीबद्दल डॉ. अताउल्ला जागीरदार व डॉ. शेख रफीक यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सलीम बिन महाफुज, सचिव श्रीमती खान सबीहा मॅडम, सहसचिव हाश्मबीन अहमद, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील, उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ, उपप्राचार्य डॉ. हुसैनी एस एस., पदव्युत्तर विभागाचे संचालक प्राध्यापक फरीद नेहरी, आयक्यूएसी चे समन्वयक डॉ. अब्दुल अनिस, करिअर कट्टाचे समन्वयक डॉ. मोहम्मद आसिफ इकबाल, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर मिर्झा असद बेग, प्राध्यापिका डॉ. शेख एजाज परवीन सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी अभिनंदन केले आहे.
