शनिवारी सकाळी 11.00 वाजता उक्कड पिंप्री येथे अंत्यसंस्कार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे खंदे समर्थक तथा भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हा सचिव राजेंद्र केशवराव बांगर वय ( 52 ) यांचे आज पुणे येथे उपचारा दरम्यान दुपारी चारच्या सुमारास निधन झाले आहे शनिवारी ( दि.17 डिसेंबर ) पहाटे पुणे येथून त्यांचे पार्थिव बीड मधील विद्यानगर पश्चिम येथील राहत्या घरी आणले जाईल. व सकाळी 8.30 पर्यंत अंतिम दर्शनासाठी ठवले जाईल. तर सकाळी 11.00 वाजता उक्कड पिंप्री ता. गेवराई येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

राजेंद्र बांगर हे तरुण वयापासूनच सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत आले. शिवसेना संघटने पासून राजकीय क्षेत्रात त्यांचे पदार्पण झाले. पुढे भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रीय कार्यकर्ते म्हणून अखेर पर्यंत काम केले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या सहवासात राहून राजकारणात सक्रीय सहभाग घेऊन आपली ओळख निर्माण केली. संघटना बांधणीचा अनुभव असल्याने भाजपा बीड जिल्हा सचिव पदाची जबादारी पक्षाने त्यांच्यावर सोपवली होती. विविध राजकीय पक्षातील नेते, कार्यकर्त्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्या दु:खद निधनाने जिल्ह्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते व मित्र परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहिणी, चुलते, पुतणे असा मोठा परिवार आहे.
परखड विचाराचा व स्पष्ट मताचा कार्यकर्ता हरपला – राजेंद्र मस्के
राजेंद्र बांगर हे स्पष्ट व परखड मताचे कार्यकर्ते होते. भारतीय जनता पार्टी पक्ष विस्तारासाठी त्यांनी सातत्याने काम केले. दांडगा लोकसंपर्क व राजकीय कामकाजातील हातोटी त्यांचाकडे होती. कोणत्याही निवडणुकीत अथवा राजकीय चळवळी मध्ये त्यांचा सहभाग उल्लेखनीय राहिला.अनुभवी कार्यकर्त्याला आम्ही मुकलो आहोत. राजेंद्र बांगर यांना बीड जिल्हा भाजपा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली, या दु:खद व कठीण संकटातून सावरण्याची शक्ती कुटुंबियांना मिळावी हि ईश्वर चरणी प्रार्थना.
