पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य जनतेने उपस्थित राहावे -आ.संदीप क्षीरसागर
राष्ट्रवादी भवन, बीड येथे वर्च्युअल रॅलीसाठी एलईडी स्क्रीन इतर व्यवस्था
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : जाणता राजा तथा देशाचे माजी कृषी मंत्री खा.शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या 82 व्या वाढदिवसानिमित्त संपुर्ण महाराष्ट्राला वर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून संबोधीत करणार असून या रॅली निमित्त जास्तीत जास्त पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी केले आहे.

आज जाणता राजा तथा देशाचे माजी कृषी मंत्री खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपल्या 82 व्या वाढदिवस एका अभिनव पद्धतीने साजरा करणार असून अभूतपूर्व वर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून सकाळी 10.10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील सामान्य जनता, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना संबोधीत करणार आहेत. याकरिता बीड जिल्हा राष्ट्रवादी भवन येथे वर्च्युअल रॅलीसाठी सभागृह, स्टेज, ध्वनी प्रक्षेपण, बॅकड्रॉप, एलईडी स्क्रीन इतर व्यवस्था करण्यात आली आहे.
तरी, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सामान्य जनतेने सकाळी 9.30 वाजता राष्ट्रवादी भवन, बीड येथे उपस्थित रहावे असे आवाहन आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी केले आहे.
