दोन दिवसीय इज्तेमासाठी लाखोंची उपस्थिती
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : तब्लिगी जमातच्या दोन दिवशीय इज्तेमाची सांगता सामूहिक प्रार्थनेने झाली. यावेळी अखंड मानवजातीच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. पहिल्या दिवशीच्या तुलनेत दोन लाखांहून अधिक लोकांनी आपली उपस्थिती नोंदवली आणि इज्तेमा यशस्वी केला.
बीड शहरापासून जवळच असलेल्या चन्हाटा फाटा परिसरात जिल्हास्तरीय इज्तेमा होणार असल्याने जवळपास दीड महिण्यांपासुन विविध नियोजनाची तयारी सुरू होती. त्यासाठी विविध कामाच्या स्वतंत्र समित्याचे गठण करण्यात आले होते. कामाच्या नियोजानानुसार इज्तेमा परिसरात नियोजित कामाची रु परेषा ठरवून देण्यात आली होती. हजारो स्वयसेवकानी इज्तेमाच्या आठ दिवस आधीपासून मदत कार्य सुरू केले होते. इज्तेमाच्या पहिल्या व दुसर्या दिवशी अशा दोन दिवसांच्या विविध धार्मिक कार्यक्र मासाठी जिल्हाभरातून येणार्या भाविकांसाठी हजारोच्या संख्येने स्वयंसेवकांनी मदत केली.
दरम्यान विविध मुस्लिम धर्मगुरूनी अल्लाह चे आदेश व प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या आचारविचारांची पेरणी करत सामाजिक जडणघडणीसह प्रेषितांच्या विचारांवर चालण्याचे उपस्थित लाखो भक्तांना उद्बोधन केले. प्रेषित मोहम्मद पैगंबरांचा यकीन करो, हा मुलमंत्र जपा, भक्ती मार्गात या. चांगले काम, चांगले विचार अंगीकारत अखंड मानवजातीचे कल्याण करण्यासाठी अल्लाहने दाखवून दिलेल्या मार्गावर चाला, असा मुलमंत्र दिला.
इज्तेमाचा समारोप अल्लाह ची इबादत सह दिन आणि दावतसाठी प्रशिक्षण यासह सायंकाळी अखंड मानवजातीच्या कल्याणासाठीच्या दुवाने करण्यात आला. जिल्हास्तरीय इज्तेमाच्या समारोपादिवशी गर्दीचा नवा विक्र म नोंदवला गेला. शहराला जोडणार्या चारही रस्त्यांवर वाहनांच्या रांगा होत्या. हजारो स्वयंसेवक इज्तेमाच्या ठिकाणी भाविक सुरिक्षत पोहोचावेत, याची दक्षता घेत होते. इज्तेमामध्ये शांती, सलोखा, समृद्धी व मानवी कल्याणासाठी अल्लाहकडे लाखोबांधवांनी दुवा मागितली.
जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून मुस्लिम समाजबांधवांना इज्तेमास्थळ दाखविण्यापासुन ते वाहनांची पार्किंग, पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था, दहा एकरवर भव्य शामियाना तसेच उच्च प्रतीची साऊंड व्यवस्था होती. विविध समित्या स्थापन केल्या होत्या. हजारो हात राबत होते. त्यामुळे इज्तेमासाठी आलेले नागरिक बीडकरांच्या चोख नियोजनामुळे भारावून गेले.